Asia Cup 2025: Oman cricket team announced for Asia Cup! Jatinder Singh named captain
Oman cricket team announced for Asia Cup : 9 सप्टेंबरपासून आशिया कप 2025 ला सुरुवात होत आहे. ही स्पर्धा 28 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. यावेळी आशिया कप टी 20 स्वरूपात खेळवला जाणार आहे. या स्पर्धेमध्ये 6 ऐवजी 8 संघ सहभाग घेणार आहेत. या 8 पैकी आतापर्यंत 5 संघ जाहीर करण्यात आले आहेत. त्यानंतर आज 25 ऑगस्ट रोजी आशिया कप स्पर्धेसाठी ओमान क्रिकेट संघाने आपल्या संघाची घोषणा केली आहे. ओमान आशिया कप 2025 च्या स्पर्धेत आपला पहिला सामना 12 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.
ओमान क्रिकेटकडून आशिया कप 2025 स्पर्धेसाठी 17 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. जतिंदर सिंह याच्याकडे ओमान संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जतिंदरने गेल्या वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याच कामगिरीच्या जोरावर त्याने टीम मॅनेजमेंटचे लक्ष आपल्याकडे वळवले आहे. त्यामुळे जतिंदर हा या स्पर्धेतील आपल्या पहिल्याच हंगामात प्रभावी कामगिरी करण्यास प्रयत्नशील असणार आहे.
ओमान संघाची आशिया कपच्या स्पर्धेमध्ये खेळण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. ओमान संघ घरच्या मैदानात झालेल्या एसीसी प्रीमियर कप 2024 स्पर्धेत उपविजेता ठरलान आहे. ओमानने यासह आशिया कप स्पर्धेचं थाटात तिकीट मिळवलं आहे. टीम मॅनेजमेंटकडून या 17 सदस्यीय संघामध्ये 4 नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या चौघांमध्ये सुफियान यूसुफ, फैजल शाह, झिक्रिया इस्लाम आणि नदीम खान यांचा समावेश आहे.
ओमानसाठी सुफियान यूसुफ विकेटकीपर म्हणून जबाबदारी पेलणार आहे. या संघात हम्माद मिर्जा याचा देखील ओमान संघात समावेश करण्यात आला आहे. हम्मादने 2024 साली झालेल्या एसीसी एमर्जिंग आशिया कप स्पर्धेमध्ये भारताविरुद्ध दमदार खेळी साकारली होती. त्यामुळे ओमान टीमला या स्पर्धेत हम्मादकडून मोठ्या खेळीची अपेक्षा नक्की असणार आहे.
हेही वाचा : रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला अलविदा का म्हटले? हिटमॅनने केला मोठा खुलासा..
जतिंदर सिंह (कर्णधार), हम्माद मिर्जा, विनायक शुक्ला (विकेटकीपर), सुफियान यूसुफ (विकेटकीपर), आशीष ओडेदरा, आमिर कलीम, मोहम्मद नदीम, सुफियान महमूद, आर्यन बिष्ट, करण सोनावले, जिक्रिया इस्लाम, हसनैन अली शाह, फैजल शाह, मोहम्मद इमरान, नदीम खान, शकील अहमद आणि समय श्रीवास्तव.