रोहित शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
Rohit Sharma retires from Test cricket : भारताचा कसोटी फलंदाज चेतेश्वर पूजाराने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याच्या निवृत्तीनंतर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अशातच आता माजी भारतीय कर्णधार आणि दिग्गज फलंदाज रोहित शर्माच्या निवृत्तीबद्दल चर्चा समोर आली आहे. त्याचे कारण म्हणजे अलीकडेच रोहित शर्मा एका कार्यक्रमात दिसून आहे. ज्यामध्ये त्याने आपल्या कसोटी क्रिकेटबद्दलचा अनुभव शेअर केला आहे. त्याने या स्वरूपाचे वर्णन मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप आव्हानात्मक असल्याचे सांगितले आहे.
रोहित शर्माने मे महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. एका वर्षापूर्वी टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने क्रिकेटच्या टी-२० स्वरूपाला निरोप दिला होता. तो आता फक्त एकदिवसीय स्वरूपात खेळताना दिसून येतो.
हेही वाचा : AUS vs SA : Dewald Brevis ने ज्या चेंडूवर षटकार ठोकला तो चेंडू घेऊन पळत सुटला चाहता ! पहा VIDEO
कसोटी क्रिकेटबदलल सांगताना रोहित शर्मा म्हणाला की, “ही अशी एक गोष्ट आहे ज्यासाठी तुम्हाला खूप तयारी करावी लागेल, कारण या खेळात तुम्हाला बराच काळ मैदानावर राहावे लागत असते. विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये, ज्यामध्ये तुम्हाला पाच दिवस खेळून काढावे लागते. मानसिकदृष्ट्या ते खूप आव्हानात्मक आणि थकवणारे राहिले आहे. पण सर्व क्रिकेटपटू प्रथम श्रेणी क्रिकेट खेळूनच मोठे झाले आहेत. जेव्हा आपली स्पर्धात्मक पातळीवर क्रिकेट खेळायला सुरवात होते. मुंबईतही क्लब क्रिकेट सामने दोन दिवस किंवा तीन दिवस चालत असतात, अशा प्रकारे आपण लहानपणापासूनच त्यासाठी तयार झालेलो असतो. यामुळे तुमच्या पुढील मार्गावर येणाऱ्या परिस्थितींना तोंड देण्यास खूप मदत होते.”
तसेच रोहित शर्मा पुढे म्हणाला की, “जेव्हा तुम्ही खूप लहान असता तेव्हा खऱ्या अर्थाने तयारीचे महत्त्व समजत नसते. पण जसजशी तुम्ही प्रगती करत पुढे पुढे जात असतात तुम्हाला समजते की ते तुम्हाला खेळात गरज असणारी एक प्रकारची शिस्त मिळत असते. तुम्हाला नेमके काय करायचे आहे? हे समजून घेणे. जेव्हा तुम्हाला सर्वात लांब फॉर्मेट खेळायचा असतो, तेव्हा खूप काम करावे लागत असते. एकाग्रता ही सर्वात महत्वाची गोष्ट असते, कारण तुम्हाला खूप चांगल्या कामगिरीची आशा असते आणि त्यासाठी मानसिकदृष्ट्या ताजेतवाने राहणे खूप आवश्यक होऊन जाते. मी मुंबईकडून खेळायला सुरुवात केली त्यानंतर भारताकडून खेळायला सुरुवात केली तेव्हा माझ्याबाबत देखील असेच घडले आहे.”