
Oman's squad for the T20 World Cup has been announced! Jatinder Singh will lead the team; these players have been given a chance.
Oman squad announced for the T20 World Cup : २०२६ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक संघ आपापले संघ जाहीर करत आहेत. दरम्यान, आता ओमानने १५ सदस्यीय संघ घोषित केला आहे. या स्पर्धेसाठी जतिंदर सिंगच्या खांद्यावर संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर यष्टीरक्षक-फलंदाज विनायक शुक्ला यांना उपकर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे. ही स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करण्यात येणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला आशिया कपमध्ये खेळलेल्या संघात ओमानकडून आपल्या संघात पाच बदल करण्यात आले आहेत. जतिंदर गेल्या टी-२० विश्वचषकात स्थान मिळवू शकलेला नाही परंतु यावेळी त्याला संधी दिली गेली आहे.
हेही वाचा : ICC Ranking : दीप्ती शर्माचा जलवा कायम! शेफाली वर्मा, रिचा घोषने दाखवली कमाल; वाचा सविस्तर
ओमान संघ चौथ्यांदा पुरुषांच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार आहे. यापूर्वी, ओमान २०१६, २०२१ आणि २०२४ च्या पुरुषांच्या टी-२० विश्वचषकात ओमान संघ खेळला होता. आगामी विश्वचषकासाठी ओमानला गट ब मध्ये स्थान देण्यात आले असून यामध्ये ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड आणि झिम्बाब्वेचा देखील समावेश आहे. ओमान संघ या विश्वचषकात आपली चांगली छाप पडण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे.
आयसीसी आशिया-ईएपी पात्रता फेरीतून संघ विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. त्यांच्या विश्वचषक मोहिमेला ९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. ओमानचा पहिला सामना कोलंबोमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. त्यांचा सामना १२ फेब्रुवारी रोजी श्रीलंकेशी, त्यानंतर १४ फेब्रुवारी रोजी आयर्लंडशी होणार आहे. त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी त्यांचा सामना ऑस्ट्रेलिया बलाढ्य संघासोबत होईल.
हेही वाचा : WPL 2026 : दिल्ली कॅपिटल्समध्ये ‘ही’ स्टार खेळाडू सामील! तर RCB ला मोठा झटका; अष्टपैलू एलिस पेरीची माघार
२०२६ च्या टी२० विश्वचषकात ७ ते २० फेब्रुवारी दरम्यान एकूण ४० गट सामने खेळले जाणार आहेत. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ २१ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान होणाऱ्या सुपर ८ टप्प्यात प्रवेश करतील. तर सुपर ८ टप्प्याच्या समाप्तीनंतर, अव्वल चार संघ बाद फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. उपांत्य फेरीचे सामने ४ आणि ५ मार्च रोजी खेळवण्यात येतील. तसेच, अंतिम सामना ८ मार्च रोजी खेळला जाणार आहे.
जतिंदर सिंग (कर्णधार), विनायक शुक्ला (उपकर्णधार), मोहम्मद नदीम, शकील अहमद, हम्माद मिर्झा, वसीम अली, करण सोनावले, फैसल शाह, नदीम खान, सुफयान महमूद, जय ओडेदरा, शफीक जान, हसीनन अली, हसीनन, हसीन, रैनिश.