एलिस पेरी(फोटो-सोशल मीडिया)
WPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी वाईट बातमी समोर आली आहे. आरसीबीची अष्टपैलू एलिस पेरी आणि दिल्ली कॅपिटल्सची अॅनाबेल सदरलँड यांच्याकडून मंगळवारी पुढील महिन्यात होणाऱ्या महिला प्रीमियर लीगमधून वैयक्तिक कारणांमुळे माघार घेण्यात आली आहे. महिला प्रीमियर लीगच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, भारतीय अष्टपैलू सायली सतघरे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात ऑस्ट्रेलियन अष्टपैलू पेरीची जागी खेळणार आहे. तर दिल्ली कॅपिटल्सने तिच्या देशबांधव अष्टपैलू सदरलँडच्या जागी ऑस्ट्रेलियन लेग-स्पिनर अलाना किंगला संघात सामील केले आहे.
हेही वाचा : IND W vs SL W : शफाली वर्माला खुणावतोय विश्वविक्रम! श्रीलंकेविरुद्ध 75 धावा करताच लिहिला जाईल इतिहास
WPL च्या ने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, “ऑस्ट्रेलियन अष्टपैलू एलिस पेरी (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) आणि अॅनाबेल सदरलँड (दिल्ली कॅपिटल्स) यांनी वैयक्तिक कारणांमुळे लीगच्या आगामी हंगामातून माघार घेतली आहे.” त्यामध्ये लिहिले आहे की, “आरसीबीने पेरीच्या जागी सायली सातघरेला संघात सामील केले आहे. सातघरे आरसीबीमध्ये ₹३० लाखांच्या बेस प्राईसवर सामील होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने सदरलँडच्या जागी अलाना किंगला संघात समाविष्ट करून घेतले आहे.”
पुढे असे लहिले आहे की, “ऑस्ट्रेलियन लेग-स्पिनरने गेल्या हंगामात यूपी वॉरियर्सचे प्रतिनिधित्व केले असून तिने २७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २७ विकेट्स काढल्या आहेत. किंग दिल्लीत ₹६० लाखांच्या बेस प्राईसवर सामील होणार आहे.” यूपी वॉरियर्सने डावखुरी वेगवान गोलंदाज तारा नॉरिसच्या जागी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू चार्ली नॉटला संघात सामील करण्यात आले आहे.
डब्ल्यूपीएलच्या पहिल्या हंगामामध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळलेल्या नॉरिसला पुढील वर्षी नेपाळमध्ये होणाऱ्या महिला टी-२० विश्वचषक पात्रता फेरीसाठी यूएसए संघात समाविष्ट करून घेतले आहे. डब्ल्यूपीएलकडून सांगण्यात आले आहे की, “नॉटला ₹१० लाखांच्या बेस प्राईसवर करारबद्ध करण्यात आले आहे.” डब्ल्यूपीएलचा चौथा हंगाम ९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान नवी मुंबई आणि वडोदरा येथे दोन टप्प्यात खेळला जाणार आहे.
हेही वाचा : पाकिस्तान संघाने थोडं तरी लाजायला हवं होतं! स्वतःच्याच खेळाडूंचे पैसे घातले घशात
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ९ जानेवारी रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यांच्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. त्यानंतर १२ जानेवारी रोजी उत्तर प्रदेश वॉरियर्स, १६ जानेवारी रोजी गुजरात जायंट्स आणि १७ जानेवारी रोजी दिल्ली कॅपिटल्सशी त्यांचा सामना करणार आहे. बेंगळुरू २९ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशविरुद्ध त्यांचा शेवटचा लीग सामना असणार आहे.तसेच दिल्ली कॅपिटल्स १० जानेवारी रोजी मुंबईविरुद्ध त्यांच्या मोहिमेची सुरुवात करेल तर २० जानेवारी रोजी मुंबईविरुद्ध दिल्ली त्यांचा शेवटचा लीग सामना खेळणार आहे.






