मुंबई : सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्धच्या मागील सामन्यातील पराभवापासून धडा घेत, गुजरात टायटन्स (GT) आज राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध लढेल. गुजरात टायटन्सचा (जीटी) कर्णधार हार्दिक पांड्या आपल्या संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही आवश्यक बदल करू इच्छितो. हार्दिक पांड्याला त्याच्या संघात खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूने सर्वोत्तम कामगिरी करावी असे वाटते.
हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्स (जीटी) आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना रंजक होण्याची अपेक्षा आहे. गुजरात टायटन्सच्या (जीटी) कमी अनुभव असलेल्या फलंदाजांसाठी राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजीला सामोरे जाणे कठीण आव्हान असेल. हा नवा संघ फलंदाजीत शुबमन गिल आणि हार्दिक पांड्या या युवा सलामीवीरांवर जास्त अवलंबून आहे.
गिल उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, परंतु त्याच्या झटपट धावा काढण्यासाठी ओळखला जाणारा कर्णधार त्याच्या फलंदाजीत अधिक सावध दिसतो आणि डावाला खोलवर नेण्याचा त्याचा प्रयत्न दिसतो. मैथ्यू वेड धावा काढण्यासाठी धडपडत आहे, तर डेव्हिड मिलरने अद्याप आपला दबदबा दाखविलेला नाही, त्यामुळे अभिनव मनोहर आणि बी साई सुदर्शनला अधिक जबाबदारीने खेळण्याची आवश्यकता आहे. मात्र, राहुल तेवतिया त्याच्या ‘फिनिशर’च्या भूमिकेचा आनंद लुटत असून मर्जीनुसार षटकार मारत आहेत.
गुजरात टायटन्सची बॉलिंग युनिट खूप मजबूत आहे. लॉकी फर्ग्युसनचा वेगवान गोलंदाजी विभागात समावेश आहे, जो जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. त्यांच्याशिवाय, भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि पांड्या हे सर्व विकेट घेणारे गोलंदाज आहेत, जे प्रतिस्पर्धी संघाला दबावाखाली ठेवू शकतात. रशीद खान अपेक्षेप्रमाणे त्यांचा सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरला आहे.
गुजराज टायटन्सच्या गोलंदाजांनी मात्र सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पराभवात चाणाक्षपणा दाखवला नाही, हा त्यांचा हंगामातील पहिला पराभव होता. ते राजस्थान रॉयल्सच्या बॅटिंग लाईन-अप विरुद्ध कसे उभे राहतात हे पाहणे मनोरंजक असेल, ज्यात जोस बटलर, प्रतिभावान देवदत्त पडिक्कल व्यतिरिक्त ‘बिग हिटर’ शिमरॉन हेटमायर आणि सॅमसन यांचा समावेश आहे.
वृद्धिमान साहा, शुभमन गिल, बी साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, जयंत यादव, रशीद खान, लॉकी फर्ग्युसन, अल्झारी जोसेफ आणि मोहम्मद शमी.