फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बाबर आझम : पाकिस्तानच्या संघाचा क्रिकेटचा ग्राफ हा दिवसेंदिवस खाली होत चालला आहे. सध्या पाकिस्तानच्या संघाचा फॉर्म खराब चालला आहे, त्यामुळे अलीकडेच बाबरला खराब फॉर्ममुळे कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले आहे. तो पाकिस्तानचा पांढऱ्या चेंडूचा कर्णधार होता, पण खराब फॉर्ममुळे त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. आता कर्णधारपदानंतर बाबरही संघ सोडताना दिसत आहे. पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरु आहे. यामध्ये पाकिस्तानच्या संघाला पहिल्या कसोटी सामन्यात निराशाजनक कामगिरीमुळे पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडविरुद्ध मुलतानमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत बाबरच्या बॅटने केवळ ३० आणि ०५ धावा केल्या होत्या.
ESPNcricinfo वर प्रसिद्ध झालेल्या वृत्तामध्ये सांगण्यात आले आहे की, बाबरला इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यातून वगळले जाऊ शकते, असे म्हटले होते. नव्याने स्थापन झालेल्या निवड समितीने बाबरला वगळण्याचा सल्ला दिल्याचे अहवालात सांगण्यात आले. मालिकेतील पहिली कसोटी गमावल्यानंतर काही तासांनी लाहोरमध्ये निवड समितीची बैठक झाली. या बैठकीला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वीही उपस्थित होते.
🚨 BABAR AZAM DROPPED. 🚨
– Babar set to be dropped from the 2nd Test against England. (Espncricinfo). pic.twitter.com/gAPsHumcVT
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 13, 2024
७ ते ११ ऑक्टोबर दरम्यान मुलतानमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीतील पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने बाबरची पाठराखण करत तो पाकिस्तानचा सर्वोत्तम फलंदाज असल्याचे म्हटले होते. प्रशिक्षक जेसन गिलेस्पीनेही याचे समर्थन केले. या बैठकीत संघाचा कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक सहभागी नसल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. १५ ऑक्टोबरपासून मुल्तानमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बाबरचा समावेश नसेल, तर तो २० ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या कायदे-ए-आझम ट्रॉफीसाठी स्वत:ला उपलब्ध करून देईल की नाही, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.