Babar-Shan Masood's innings went waste, Pakistan's shameful defeat, South Africa crushed them 2-0
Pakistan vs South Africa Test Series : दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात पाकिस्तानवर शानदार विजय नोंदवला आणि 2-0 असा क्लीन स्वीप दिला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेने न्यूलँड्स, केपटाऊन येथे 10 गडी राखून विजय मिळवला. पाकिस्तानने दुसऱ्या डावानंतर दक्षिण आफ्रिकेला 58 धावांचे लक्ष्य दिले होते. जे प्रोटीज संघाने सहज साध्य केले.
अवघ्या ७.१ षटकांत मिळवून दिला विजय
एडन मार्कराम आणि डेव्हिड बेडिंगहॅम यांनी कसोटीच्या चौथ्या दिवशी अवघ्या ७.१ षटकांत यजमान संघाला विजय मिळवून दिला. टेंबा बावुमानेही आपला नाबाद विक्रम कायम ठेवला आहे कारण त्याने आतापर्यंत कर्णधार म्हणून एकही कसोटी गमावली नाही. टेम्बा बावुमाने आत्तापर्यंत नऊ कसोटीत प्रोटीज संघाचे नेतृत्व केले असून आठ विजय आणि एक बरोबरीत त्याच्या नावावर आहे. जून महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
दुसऱ्या डावात शान मसूदची शानदार खेळी व्यर्थ
तिसऱ्या दिवसाच्या खेळात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला फॉलोऑन दिला होता. पाकिस्तानने पहिल्या डावात 194 धावा आणि दुसऱ्या डावात 498 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात कर्णधार शान मसूदने शानदार शतक झळकावले तर बाबर आझमने 81 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून दुसऱ्या डावात कागिसो रबाडाने ३, मार्को यानसेनने २ आणि केशव महाराजने ३ बळी घेतले.
पाकिस्तानचा पुढचा सामना कोणाशी होणार?
दक्षिण आफ्रिकेनंतर पाकिस्तानला वेस्ट इंडिजविरुद्ध खेळायचे आहे. पाकिस्तानला 16 जानेवारीपासून वेस्ट इंडिजविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. वेस्ट इंडिजने यासाठी संघ जाहीर केला आहे. मात्र पाकिस्तानचा संघ अद्याप जाहीर झालेला नाही. यानंतर पाकिस्तानला पाकिस्तान ट्राय नेशन सीरिजमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सामना खेळायचा आहे.