
Oh my, what a time it is for Pakistan! 'We even washed the dishes...' The captain revealed the story of the treatment he received at the hotel
Pakistan national hockey team had to wash dishes : पाकिस्तान राष्ट्रीय हॉकी संघाच्या अलिकडच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याने पुन्हा एकदा देशाच्या क्रीडा प्रशासनाच्या भोंगळ कारभार उघड केला आहे. फआयएच प्रो लीगच्या दुसऱ्या टप्प्यात दाखल झालेल्या पाकिस्तानी संघाला केवळ सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला नाही तर मैदानाबाहेरील अपमानजनक परिस्थितीला देखील सामोरे जावे लागले आहे. लाहोर विमानतळावर परतल्यावर संघाचा कर्णधार शकील अम्मद बटने माध्यमांसमोर अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. तसेच पाकिस्तान हॉकी फेडरेशनवर जोरदार टीका देखील केली आहे. हे नेमकं प्रकरण काय? याबाबत आपण माहिती घेऊया.
पाकिस्तानी संघाचा कर्णधार शकील अम्मद बटने स्पष्ट केले की, ऑस्ट्रेलियातील त्यांच्या संघाला हॉटेल बुकिंगअभावी रस्त्यावर फिरावे लागले नाही तर सामन्यासाठी निघण्यापूर्वी त्यांनी भांडी देखील धुतली आहेत. शकील अम्मद बट म्हणाला की, ” आता पानी डोक्याच्यावरुण चालले आहे. आम्ही फेडरेशनच्या सध्याच्या व्यवस्थापनाखाली खेळणे सुरू ठेवू शकत नाही.” तसेच तो पुढे म्हणाला की, ” जेव्हा खेळाडूंना सामना खेळण्यासाठी जाण्यापूर्वी स्वयंपाकघर स्वच्छ करावे करून भांडी धुवावी लागत असतील तर आमच्याकडून चांगल्या निकालांची अपेक्षा कशी करता येईल?”
या दौऱ्यात पाकिस्तान संघाला अनेक अडचणींनासमोरे जावे लागले. कॅनबेराला जाण्यासाठी विमानात चढण्यापूर्वी त्यांना सिडनी विमानतळावर १३-१४ तास वाट देखीळ पाहावी लागली. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना कळले की पाकिस्तान हॉकी फेडरेशनकडून आगाऊ पैसे न देण्यात आल्यामुळे बुकिंग होऊ शकले नाही. खेळाडू आणि कर्मचारी तासन्तास रस्त्यावर फिरत राहिले. नंतर, स्थानिक पाकिस्तानी लोकांच्या मदतीने एका हॉटेलची व्यवस्था केली गेली. कर्णधाराने पुढे सांगितले की “एअरबीएनबी द्वारे बुकिंग फक्त १० दिवसांसाठी होते, परंतु संघ १३ दिवसांसाठी तिथे राहणार होता. १० दिवसांनंतर, त्यांना एका स्वस्त आणि कमी सुसज्ज हॉटेलमध्ये आपला मुक्काम हलवावा लागला. दरम्यान, पाकिस्तान क्रीडा मंडळाने पुष्टी केली की त्यांनी हॉटेल व्यवस्थेसाठी पीएचएफला १ कोटी पाकिस्तानी रुपये देण्यात आले होते, परंतु फेडरेशनकडून त्याचा योग्य वापर करण्यात आला नाही.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीविरुद्ध सामने खेळले होते, परंतु या सर्व सामन्यात पाकिस्तान संघाला पराभव स्वीकारावा लागला. पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-३ असा गमावला. या दरम्यान, पीएचएफचे मुख्य संरक्षक असलेले पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.