Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PAK vs BAN Live Score: पाकिस्तानची बांगलादेशवर मात, 41 वर्षाने पहिल्यांदाच Asia Cup मध्ये भारत-पाकिस्तान आमनेसामने

फायनलसाठी आज बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सामना खेळला गेला. मात्र दोन्ही देशांनी अत्यंत वाईट कामगिरी केली. या खेळात पाकिस्तानने बाजी मारत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 25, 2025 | 11:58 PM
बांगलादेशला नमवून पाकिस्तान आशिया कप फायनलमध्ये (फोटो सौजन्य - Instagram)

बांगलादेशला नमवून पाकिस्तान आशिया कप फायनलमध्ये (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Close
Follow Us:
  • आशिया कप २०२५ च्या सुपर – ४ मधील फायनल सामना
  • बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये मॅच
  • पाकिस्तानने केला फायनलमध्ये प्रवेश 

आशिया कपच्या अंतिम सामन्यासाठी बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात बांगलादेश पाकिस्तानच्या १३६ धावांच्या लक्ष्याचा केला. पाकिस्तानने ठेवलेले लक्ष्या बांगलादेशसाठी अत्यंत कठीण ठरल्याचे पहिल्या १० ओव्हर्समध्ये दिसून आले. मात्र मधल्या फळीने डाव सावरण्याचा प्रयत्न बांगालदेशच्या खेळाडूंनी केला, तरीही पाकिस्तानच्या गोलंदाजानी हा डाव हाणून पाडला. काही सुंदर शॉर्ट्स लावण्याचे प्रयत्न बांगलादेशच्या खेळाडूंनी केले होते. मात्र या नादात त्यांनी आपल्या विकेट्सदेखील गमावल्या. मात्र शेवटपर्यंत बांगलादेशच्या खेळाडूंनी लढा दिला. 

Asia Cup 2025: 6 सामन्यात 4 Duck, सईम अय्युबने संपूर्ण पाकिस्तानमध्ये कापले नाक, अत्यंत लाजिरवाणा रेकॉर्ड

बांगलादेशची गोलंदाजी

बांगलादेशी गोलंदाजांनी पहिल्या डावात शानदार कामगिरी करत पाकिस्तानची फलंदाजी लाईनअप उध्वस्त केली. अंतिम सामन्यासाठीच्या या ‘करो या मरो’ सामन्यात मोहम्मद हरिसने पाकिस्तानसाठी सर्वाधिक ३१ धावा केल्या. पाकिस्तानचा टॉप ऑर्डर मात्र पूर्णपणे अपयशी ठरला आणि पॉवरप्ले वाया घालवला. दरम्यान, सॅम अयुबने पुन्हा एकदा शून्यावर बाद होऊन विक्रम प्रस्थापित केला. बांगलादेशकडून तस्किन अहमदने सर्वाधिक तीन बळी घेतले.

तत्पूर्वी, बांगलादेशने नाणेफेक जिंकून पाकिस्तानविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजचा सामना जिंकणारा संघ आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल आणि अंतिम सामन्यात भारताशी सामना करेल. यापूर्वी, २० सप्टेंबर रोजी, बांगलादेशने श्रीलंकेला हरवून पहिला सुपर ४ सामना खेळला. तथापि, त्यानंतर त्यांनी भारताविरुद्धचा दुसरा सुपर ४ सामना गमावला.

साहिबजादा फरहानचा अहंकार काढला बाहेर

या सामन्यात पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने डावाची सुरुवात केली. त्याने तस्किन अहमदच्या चेंडूवर एक शक्तिशाली चौकार मारला. तथापि, पुढच्याच चेंडूवर शॉट घेण्याचा प्रयत्न करताना फरहानने पॉइंट फिल्डरला झेल दिला. यामुळे केवळ चार धावा काढून त्याचा डाव संपला आणि भारतासमोरचा त्याचा अहंकार अशा पद्धतीने बाहेर पडला. 

BAN vs PAK : पाकिस्तानी फलंदाजांची हराकिरी; बांगलादेशसमोर136 धावांचे लक्ष्य; तस्किन अहमद चमकला

बांगलादेशचा संघ ६३ धावांत अर्ध्यावर बाद 

गोलंदाजीत दमदार कामगिरी करणाऱ्या बांगलादेशी संघाला १३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अपयश आले. त्यांनी फक्त ६३ धावांत पाच विकेट गमावल्या. त्यानंतर ६ आणि ७ व्या विकेट्ससाठी खेळाडूंनी टिकून राहण्याचा प्रयत्न केला मात्र पाकिस्तानी गोलंदाजांसमोर त्यांचा निभाव लागला नाही आणि काही अंतराच्या फरकाने खेळाडू तंबूत परतले. केवळ १३६ धावांचे लक्ष्यही बांगलादेश गाठू शकला नाही.

पुन्हा रंगणार भारत-पाकिस्तान सामना

२८ सप्टेंबर रोजी आता ४१ वर्षांनी पहिल्यांदाच आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार असून या सामन्याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. आशिया कप भारताकडे येणार का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय आणि पाकिस्तानकडून हरणे भारताला अजिबात मान्य होणार नाही. त्यामुळे भारताचा विजयी रथ अंतिम सामना जिंकूनच भारतात परत येईल अशी अपेक्षा आता चाहते करत आहेत. सूर्यकुमार यादवची ही टीम पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरेल आणि हा सामना जिंकूनच येईल अशी चाहत्यांनी मनोमन प्रार्थना आहे. 

दोन्ही संघ कसे आहेत?

बांग्लादेश (प्लेइंग इलेव्हन): सैफ हसन, परवेझ हुसैन इमॉन, तौहीद हृदोय, शमीम हुसेन, झाकेर अली (यष्टीरक्षक/कर्णधार), नुरुल हसन, महेदी हसन, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): साहिबजादा फरहान, फखर जमान, सैम अयुब, सलमान आगा (कर्णधार), हुसैन तलत, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद

Web Title: Pakistan vs bangladesh live score asia cup 2025 super four match updates pak won the match and entered in final

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 11:58 PM

Topics:  

  • Asia Cup
  • Asia cup 2025
  • PAK vs BAN

संबंधित बातम्या

Asia Cup 2025: 6 सामन्यात 4 Duck, सईम अय्युबने संपूर्ण पाकिस्तानमध्ये कापले नाक, अत्यंत लाजिरवाणा रेकॉर्ड
1

Asia Cup 2025: 6 सामन्यात 4 Duck, सईम अय्युबने संपूर्ण पाकिस्तानमध्ये कापले नाक, अत्यंत लाजिरवाणा रेकॉर्ड

Asia cup 2025 : जिंकूनही भारतीय संघाच्या झोळीत अपयश? ‘या’ भागात पाकिस्तानने राखला दबदबा; वाचा सविस्तर 
2

Asia cup 2025 : जिंकूनही भारतीय संघाच्या झोळीत अपयश? ‘या’ भागात पाकिस्तानने राखला दबदबा; वाचा सविस्तर 

Asia cup 2025 : करो या मरोच्या सामन्यात बांगलादेशचा TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; पाकिस्तान करणार फलंदाजी 
3

Asia cup 2025 : करो या मरोच्या सामन्यात बांगलादेशचा TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; पाकिस्तान करणार फलंदाजी 

बांगलादेशविरुद्ध इम्पॅक्ट प्लेअर पुरस्कारावर ‘या’ खेळाडुने कोरले नाव! BCCI कडून व्हिडिओ शेअर 
4

बांगलादेशविरुद्ध इम्पॅक्ट प्लेअर पुरस्कारावर ‘या’ खेळाडुने कोरले नाव! BCCI कडून व्हिडिओ शेअर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.