भारत वि पाकिस्तान(फोटो-सोशल मीडिया)
IND-PAK : आशिया कप २०२५ स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहचली आहे. या स्पर्धेत आता तीन सामने खेळायचे बाकी आहेत. यातील एक सामना पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात खेळला जाणार आहे, तर दुसरा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघाने सुपर फोरमधील बांगलादेशविरुद्ध सामना जिंकून अंतिम फेरीत दाखल झाला आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील विजेता संघ अंतिम सामन्यात भारताविरुद्ध खेळणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ चांगली कामगिरी करताना दिसत आहे. त्या व्यतिरिक्त पाकिस्तानची कामगिरी पाहता, हा संघ आजच्या सामन्यात बांगलादेशला मात देऊन अंतिम फेरीत धडक मारेल असे बोलले जात आहे. यावरून अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.
हेही वाचा : Shreyas Iyer चा रेड बॉल क्रिकेटमधून ब्रेक! BCCI ने सोडले मौन, केला मोठा खुलासा…
आज बांगलादेश आणि पाकिस्तान अमानेसामाने येणार आहे. पाकिस्तानची आकडेवारी बघता आजचा सामना पाकिस्तान जिंकेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामागील कारण म्हणजे दोन्ही संघातील रेकॉर्ड आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत २५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात आले आहेत. या दरम्यान पाकिस्तानी संघाने २० सामन्यात बाजी मारली आहे, तर बांगलादेश संघाने फक्त पाच सामनेच जिंकता आले आहेत.
आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानची गोलंदाजीच नाही तर पाकिस्तानची फलंदाजी देखील बांगलादेशपेक्षा मजबूत असल्याचे दिसते आहे. पाकिस्तान संघात साहिबजादा फरहान, फखर जमान, मोहम्मद हरिस आणि सैम अयुब सारखे स्फोटक फलंदाजांचा भरणा आहे. मधल्या फळीत कर्णधार सलमान अली आघा, हसन नवाज, हुसेन तलत आणि खुशदिल शाह सारखे खेळाडू आहेत जे सामना फिरवू शकतात. म्हणूनच असे म्हटले जात आहे की, आजच्या सामन्यात पाकिस्तानचा संघ विजयाचा प्रबळ दावेदार आहे.
हेही वाचा : IND vs BAN : चल्याने दिला गुरु युवराज सिंगला धोबी पछाड! अभिषेक शर्माच्या रडारवर हिटमॅन शर्माचा विक्रम
आशिया कप २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघ आधीच अंतिम सामन्यात पोहचला आहे. तर आजचा पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामना जिंकणारा संघ दुसऱ्या क्रमांकाचा संघ म्हणून अंतिम सामन्यात धडक मारणार आहे.