Pakistan's withdrawal from Asia Cup! This team benefited; It will affect future competitions
Pakistan withdraws from Hockey Asia Cup 2025: हॉकी आशिया कपल अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना पाकिस्तान संघाने आशिया कपमधून माघार घेतली आहे. हॉकी आशिया कप २०२५ ही स्पर्धा २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. भारताला हॉकी आशिया कपचे यजमानपदाचा मान मिळाला आहे. भारताने या स्पर्धेचे यजमानपद बिहार राज्याकडे सोपवले आहे. परंतु, या स्पर्धेत पाकिस्तान हॉकी आशिया कपसाठी भारत दौरा करणार करणार नसल्याची बातमी समोर आली आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानने या स्पर्धेतून माघार घेतली असल्याची माहिती मिळत आहे. जर पाकिस्तान संघ या स्पर्धेत सहभागी झाला नाही तर त्याच्या जागी बांगलादेश संघाचा समावेश करण्यात येणार आहे. हॉकी इंडियाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे की, आता पाकिस्तानऐवजी बांगलादेशचा या स्पर्धेत समावेश केला जाणार आहे.
हेही वाचा : AUS vs SA : ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर! ‘या’ तीन दिग्गजांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून वगळले
माध्यम संस्थेच्या वृत्तानुसार, सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान हॉकी फेडरेशनकडून भारत दौरा करण्यास नसल्याचे सांगण्यात आले आहे. तथापि, या प्रकरणात, भारत सरकारकडून आधीच सांगण्यात आले होते की ते आशिया कपसाठी पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा देणार आहेत. हॉकी इंडियाने मान्य केले आहे की आता पाकिस्तानचा संघ आशिया कप खेळण्यासाठी भारतात येणार नाही. तथापि, त्यांनी असे देखील म्हटले आहे की पुढील ४८ तासांत परिस्थिती सुधारण्याची शक्यता. त्यानंतर प्रकरणाचे चित्र स्पष्ट होणार. आशिया कपच्या आयोजकांकडून ८ संघांच्या या स्पर्धेत आता पाकिस्तानऐवजी बांगलादेशचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हॉकी इंडियाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, भारत सरकारने याधीच सांगितले होते की ते पाकिस्तानच्या खेळाडूंना व्हिसा देण्यास तयार आहे, परंतु जर ते भारतात येऊन खेळण्यास इच्छुक नसल्यास तो आमचा प्रश्न नाही. जर पाकिस्तान येत नसेल तर आम्ही बांगलादेशला या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आधीच आमंत्रित केले आहे, परंतु ते निश्चित करण्यासाठी अद्याप ४८ तास असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा : IND vs PAK : PCB ची घाई येणार अंगलट? ‘त्या’ घोषणेमुळे भारताची लागणार लॉटरी; युवा संघ पाकला पाजणार पाणी
त्यांनी पुढे सांगितले की, बांगलादेशने देखील अद्याप कोणती सहमती दिलेली नाही. पाकिस्तानकडून देखील कोणता देखील प्रतिसाद आलेला नाही. परंतु आता असे दिसून येत आहे की, पाकिस्तानऐवजी बांगलादेशचा या स्पर्धेत समावेश केला जाणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताशी झालेल्या लष्करी संघर्षानंतर आशिया कपमध्ये पाकिस्तानचा सहभाग अनिश्चित झाला.
आशिया कप ही २०२६ मध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्रता स्पर्धा देखील असणार आहे. यजमान भारताव्यतिरिक्त, आशिया कपमध्ये चीन, जपान, मलेशिया, दक्षिण कोरिया, ओमान आणि चिनी तैपेई या संघांचा समावेश आहे.