पाकिस्तान टीम(फोटो-सोशल मीडिया)
IND vs PAK : आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरवात होत आहे. यावेळी आशिया कप टी 20 स्वरूपात खेळला जाणार आहे. आशिया कप 2025 युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघ आशिया कपसाठी तयारीला लागला असला तरी अद्याप संघांची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र भारताचा प्रतिस्पर्धी संघ पाकिस्तानच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून आशिया कप 2025 स्पर्धेसाठी 17 ऑगस्टला 17 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. पीसीबीच्या या घोषणेमुळे भारताला अप्रत्यक्ष मदतच झाली आही. पाकिस्तानचा संघ जाहीर करण्यात आल्यामुळे भारताला कोणत्या 11 खेळाडूंचना सामोरे जावे लागणार? याबाबत स्पष्टता आली आहे. त्यामुळे 14 सप्टेंबरला होणाऱ्या पाकिस्तान विरूद्धच्या हायव्होल्टेज सामन्यात रणनीती आखण्यास सोपे जणार आहे.
आशिया कप 2025 स्पर्धेमध्ये सलमान अली आगाह हा पाकिस्तानची धुरा संभाळणार आहे. तसेच या स्पर्धेत पाकिस्तानकडून 5 खेळाडू पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळणार आहेत. यामध्ये अबरार अहमद, सॅम अय्यूब, सुफियान मुकीम, हसन नवाज आणि साहिबजादा फरहान यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या बाजूला निवड समितीने बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या दोन अनुभवी खेळाडूंना संघातून वगळले आहे.
हेही वाचा : टीम इंडियासाठी Asia cup 2025 पूर्वी खुशखबर! ‘मिस्टर 360’ फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण
टीम इंडियाने आशिया कप आणि आयसीसी वर्ल्ड कप या स्पर्धांमध्ये नेहमीच पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले आहे. भारताविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानसाठी मोठं आव्हान असणार आहे. यावेळीच्या टी 20 स्वरूपामुळे विराट आणि रोहित ही जोडी या स्पर्धेत खेळताना दिसणार नाहीत. ही एकमेव गोष्ट पाकिस्तानसाठी दिलासादायक असणार आहे. यावेळी बीसीसीआय निवड समिती भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना संघात स्थान देणार? याबाबत अद्याप काही एक स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा : AUS vs SA : दक्षिण आफ्रिकेचा एकदिवसीय संघ जाहीर: ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘या’ नवीन चेहऱ्यांची लागली वर्णी
आशिया कपआधी पाकिस्तान संघ टी 20 तिरंगी सिरीज खेळणार आहे. पाकिस्तानसमोर या मालिकेत यूएई आणि अफगाणिस्तान या दोन संघाचे आव्हान असणार आहे. ट्राय सीरिजमध्ये एकूण 7 सामने खेळले जाणार आहे. ही सीरज 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या दरम्यान यूएईमध्ये होणार आहे. या सिरीजचा पाकिस्तानला नक्कीच फायदा होणार आहे. प्रत्येक संघ इतर 2 संघांविरुद्ध 2-2 सामने खेळणार आहे.