Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘एमएस धोनीच्या चित्रपटामुळे प्रेरणा…’, ‘हा’ पाकिस्तानी क्रिकेटपटू पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरला; एकदा वाचाच 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेसाठी उस्मान तारिकला संघात संधी मिळाली आहे. धोनीच्या प्रवासावरील चित्रपटाने पाकिस्तानी क्रिकेटपटू उस्मान तारिकला क्रिकेटमध्ये परतण्याची मोठी प्रेरणा मिळाली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 29, 2025 | 03:38 PM
'Inspired by MS Dhoni's film...', 'this' Pakistani cricketer returns to the cricket field; Read it once

'Inspired by MS Dhoni's film...', 'this' Pakistani cricketer returns to the cricket field; Read it once

Follow Us
Close
Follow Us:
  • धोनीच्या चित्रपटाने पाकिस्तानी क्रिकेटपटूला क्रिकेटमध्ये परतण्याची  प्रेरणा
  • उस्मान तारिकने भावना केल्या व्यक्त
  • धोनी निवृत्त झाला असला तरी त्याची क्रेज मात्र अद्यापही कायम

Pakistani player inspired by MS Dhoni’s film : भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि एक उत्तम विकेटकीपर-फलंदाज एमएस धोनी निवृत्त झाला असला तरी त्याची क्रेज मात्र अद्यापही कायम आहे. तो जगभरातील क्रिकेटपटूंसाठी अजून देखील  प्रेरणादायी ठरत आहे. पाकिस्तानमध्ये देखील त्याचे चाहते असून धोनीच्या प्रवासावरील चित्रपटाने एका पाकिस्तानी क्रिकेटपटूला क्रिकेटमध्ये परतण्याची मोठी प्रेरणा मिळाली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेसाठी पाकिस्तान संघात समाविष्ट करण्यात आलेल्या उस्मान तारिकने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने सांगितले की, स्थानिक सर्किटमध्ये खेळल्यानंतर त्याने खेळ सोडून देण्यात आला होता. तथापि, धोनीवर आधारित चित्रपटाने त्याला क्रिकेटच्या मैदानामध्ये परतण्याची प्रेरणा मिळाली. उस्मान तारिक याबाबत बोलताना म्हणाला की, “एमएस धोनीच्या जीवनावरील चित्रपट पाहिल्यानंतर त्याने दुबईमध्ये आपली कारकीर्द सोडून पुन्हा क्रिकेटकडे वळला. या चित्रपटामुळे त्याला पुन्हा कठोर परिश्रम करण्याची आणि त्याची स्वप्ने पूर्ण करण्याची प्रेरणा दिली.”

हेही वाचा : आई ती आईचं…! छठ पूजेदरम्यान सूर्यकुमार यादवच्या आईने श्रेयस अय्यरच्या तब्ब्येतीसाठी केली प्रार्थना, पाहा व्हिडिओ

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेसाठी २७ वर्षीय तारिकला पहिल्यांदाच पाकिस्तानच्या टी-२० आंतरराष्ट्रीय संघात स्थान देण्यात आल्या आहेत. तारिकने या वर्षी कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये खेळला आणि २० विकेट्सकाढल्या आहेत. तो दक्षिण आफ्रिकेचा माजी फिरकी गोलंदाज इम्रान ताहिरनंतर दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.

काय  म्हणाला तारीक?

तारिक म्हणाला, “निवड न झाल्यानंतर, मी खेळ सोडून दिला आणि दुबईतील एका खरेदी कंपनीत सेल्समन म्हणून काम करायला सुरुवात केली. तिथे मी ‘एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट पाहिला आणि त्यामुळे मला खूप प्रेरणा मिळाली. मी माझी नोकरी सोडली आणि पुन्हा क्रिकेट खेळण्यासाठी पाकिस्तानला परत आलो,” तारिकने मंगळवारी एका स्पोर्ट मिडियाला सांगितले.

‘एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ हा बायोपिक २०१६ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. तारिकची निवड क्वेटा ग्लेडिएटर्सने पाकिस्तान सुपर लीगच्या २०२४ आवृत्तीसाठी केली होती, परंतु त्याची गोलंदाजी कृती बेकायदेशीर आढळल्याने नंतर त्याचा करार रद्द केला गेला.

त्याची कृती विचित्र मानण्यात आली होती. तारीक  गोलंदाजी करताना खूप थांबतो, सुमारे दोन सेकंद पूर्णपणे थांबतो आणि नंतर साइड-आर्म अॅक्शनसह ऑफ-ब्रेक गोलंदाजी करतो. तो रविचंद्रन अश्विनसारखा दिसतो, परंतु माजी भारतीय फिरकी गोलंदाजाचा ब्रेक तारिकइतका  लांब नाही. अश्विनची गोलंदाजी कृती कधी देखील नोंदवली गेलेली नाही.

हेही वाचा : धक्कादायक! सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये महिलेवर चाकू हल्ला; सहा पुरुषांकडून करण्यात आला पाठलाग

तारिक पुढे म्हणाला की, त्याची कोपर असामान्य असून ज्यामध्ये एकाऐवजी दोन कोपरे आहेत. त्याच्याकडून युक्तिवाद करण्यात आला की, केला की, “मला जन्मतःच उजव्या कोपराचे दोन कोपरे असलेले एक वेगळे कोपरे होते.” बेकायदेशीर चेंडूंवरील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नियम आता शारीरिक विकृतींना कोणतीही परवानगी देत ​नाही कारण श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन आणि पाकिस्तानचा शोएब अख्तर यांना जन्मजात विकृतींपासून सूट दिली गेली होती. त्याची गोलंदाजी कृती योग्य असल्याचे आढळल्यानंतर, तारिकने कॅरिबियन प्रीमियर लीग २०२५ मध्ये शानदार कामगिरी केली आणि तो पाकिस्तानकडून खेळण्यास सज्ज आहे.

Web Title: Pakistani cricketer usman tariq returns to cricket field thanks to ms dhonis film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 03:38 PM

Topics:  

  • Mahendra Singh Dhoni
  • MS Dhoni Captain

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.