फोटो सौजन्य : X
पर्पल – ऑरेंज कॅप विनर : आज आयपीएल 2025 चा शेवटचा साखळी सामना खेळवला जाणार आहे हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात रंगणार आहे. यंदा आयपीएलचा 18 वा सीजन खेळवला जात आहे. या सीझनमध्ये अनेक नव्या खेळाडूंची चेहरे पाहायला मिळाले त्यांनी या सिझनमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. आयपीएल 2025 चा अंतिम सामना हा 3 जून रोजी खेळवला जाणार आहे. त्याआधी मागील 17 वर्षांमध्ये फलंदाजांनी गोलंदाजीमध्ये आघाडीवर कोण होतं सर्वात्तम फलंदाज आणि गोलंदाज कोण होते हे पाहणे मनोरंजक ठरेल.
पहिल्या हंगामात म्हणजे २००८ मध्ये, पाकिस्तानी गोलंदाज सोहेल तन्वीर पर्पल कॅप विजेता ठरला. राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या तन्वीरने ११ सामन्यांमध्ये २२ विकेट्स घेतल्या. त्या हंगामात, पंजाब किंग्जकडून खेळणाऱ्या शॉन मार्शने फलंदाजीत ऑरेंज कॅप जिंकली. तर, सध्याचे भारतीय प्रशिक्षक गौतम गंभीर दुसऱ्या स्थानावर होते. पहिल्या हंगामात गौतम दिल्लीकडून खेळत होता.
RCB vs LSG : दुखापतीमुळे वाढल्या आरसीबीच्या अडचणी! अशी असु शकते प्लेइंग इलेव्हन
आयपीएलमध्ये गोलंदाज आणि फलंदाजांचा मोठा वाटा आहे. प्रत्येक हंगामात वेगवेगळे तारे उदयास आले आहेत. सचिन तेंडुलकरपासून ते ख्रिस गेल आणि विराट कोहलीपर्यंत अनेक फलंदाजांनी येथे राज्य केले आहे. तर गोलंदाजीत आरपी सिंग, प्रग्यान ओझा, मोहित शर्मा, ड्वेन ब्राव्हो आणि हर्षल पटेल हे स्टार आहेत. काही हंगाम असे होते जेव्हा ऑरेंज आणि पर्पल कॅप विजेते दोन्ही एकाच संघाचे होते. २०१३ मध्ये पहिल्यांदाच असे घडले जेव्हा चेन्नई सुपर किंग्जचा मायकेल हसी फलंदाजीत अव्वल स्थानावर होता आणि त्याच संघाचा ड्वेन ब्राव्हो गोलंदाजीत अव्वल स्थानावर होता. २०१७ मध्ये, SRH च्या डेव्हिड वॉर्नरने ऑरेंज कॅप जिंकली तर त्याच संघाच्या भुवनेश्वरने पर्पल कॅप जिंकली. २०२२ आणि २०२३ मध्येही, त्याच संघातील एका फलंदाजाने आणि गोलंदाजाने ऑरेंज आणि पर्पल कॅप्स जिंकले.
आयपीएल सिझन | ऑरेंज कॅप विजेता | धावा | पर्पल कॅप विजेता | विकेट |
---|---|---|---|---|
2008 | शॉन मार्श-PBKS | 616 | सोहेल तन्वीर-आरआर | 22 |
2009 | मॅथ्यू हेडन-सीएसके | 572 | आरपी सिंग-डेक्कन | 23 |
2010 | सचिन तेंडुलकर-एमआय | 618 | प्रज्ञान ओझा-डेक्कन | 21 |
2011 | क्रिस गेल-आरसीबी | 608 | प्रज्ञान ओझा-डेक्कन | 28 |
2012 | क्रिस गेल-आरसीबी | 733 | मॉर्न मॉर्केल-डीसी | 25 |
2013 | मायकेल हसी-सीएसके | 733 | ड्वेन ब्राव्हो-सीएसके | 32 |
2014 | रॉबिन उथप्पा-केकेआर | 660 | मोहित शर्मा-सीएसके | 23 |
2015 | डेव्हिड वॉर्नर-SRH | 562 | ड्वेन ब्राव्हो-सीएसके | 26 |
2016 | विराट कोहली-आरसीबी | 973 | भुवनेश्वर कुमार-एसआरएच | 23 |
2017 | डेव्हिड वॉर्नर-SRH | 641 | भुवनेश्वर कुमार-एसआरएच | 26 |
2018 | केन विल्यमसन-SRH | 735 | अँड्र्यू टाय-पीबीकेएस | 24 |
2019 | डेव्हिड वॉर्नर-SRH | 692 | इम्रान ताहिर-सीएसके | 26 |
2020 | केएल राहुल-पीबीकेएस | 670 | कागिसो रबाडा-डीसी | 30 |
2021 | ऋतुराज गायकवाड – सीएसके | 635 | हर्षल पटेल-RCB | 32 |
2022 | जोस बटलर-आरआर | 863 | युजवेंद्र चहल-आरआर | 27 |
2023 | शुभमन गिल-जीटी | 890 | मोहम्मद शमी-जीटी | 28 |
2024 | विराट कोहली-आरसीबी | 741 | हर्षल पटेल-PBKS | 24 |
24