Question to Rashid Khan, Pakistan captain's face fell! Salman Ali's fiery dance in a press conference; Video goes viral
T20 Tri-series : पाकिस्तान क्रिकेट टीम नेहमीच काही ना काही कारणांनी चर्चेत येत असते. पाकिस्तानच्या खेळाडूंची खूप वेळा नाचक्की झालेली दिसून आली आहे. अशातच आता आशिया कप 2025 पूर्वी पाकिस्तान टी 20 तिरंगी मालिका खेळणार आहे. या मालिकेत सलमान अली आगा पाकिस्तानची धुरा सांभाळणार आहे.ही मालिका 29 ऑगस्टपासून खेळवली जाणार आहे. मात्र त्याआधीच सलमान अली आगा आणि पाकिस्तानचा भर चालू पत्रकार परिषदेत चांगलाच अपमान सहन करावा लागला आहे. नेमकं काय घडलं. हे जाणून घेऊया.
हेही वाचा : ‘त्याची कारकीर्द उत्तम पण..’, रविचंद्रन अश्विनच्या आयपीएलमधून निवृत्तीवर आकाश चोप्राचे भाष्य चर्चेत..
अफगाणिस्तान, यजमान यूएई आणि पाकिस्तान यांच्यात टी 20 तिरंगी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषेदमध्ये तिन्ही संघांचे कर्णधार हजर होते. या पत्रकार परिषदेत पत्रकाराकडून विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाने पाकिस्तानचा अपमान झाल्याचं बोललं जातं आहे.
तिरंगी मालिकेपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत तिन्ही संघांच्या कर्णधारांना ट्राय सीरिज आणि आशिया कप 2025 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न विचारले गेले. या दरम्यान एका पत्रकाराने अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानला प्रश्न केल्यावर मात्र पाकिस्तानचा कर्णधार सलमानचा चेहरा पडल्याचे दिसून आले.
पाकिस्तानचा संघ हा आशियामधील भारतीय संघांनंतर टॉपचा दुसरा संघ होता. परंतु पाकिस्तानच्या संघाची कामगिरी अलीकडे खूप ढासळली. पाकिस्तानच्या संघाला गेल्या काही वर्षांत त्यांना साजेशी अशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तान क्रिकेट संघाने काही वर्षांत चमकदार कामगिरी केली आहे. अफगाणिस्तान आशियातील टी 20 क्रिकेटमधील दुसरा यशस्वी संघ म्हणून उदयास आलेला संघ संघ आहे. या मुद्द्याला पडकून पत्रकाराने एक प्रश्न विचारला.
Afghanistan captain Rashid Khan talks about the teams on their radar in the Asia Cup #TOKSports #RashidKhan #AsiaCup pic.twitter.com/A6zGnb3zMK
— TOK Sports (@TOKSports021) August 28, 2025
रशीदला प्रश्न विचारण्यात आला की, “अफगाणिस्तान आशियातील टी 20 क्रिकेटमधील दुसरा सर्वोत्तम संघ झाला आहे. त्यामुळे या तिरंगी मालिकेसाठी तुमचं लक्ष्य काय असणार आहे?”, या प्रश्नाने मात्र राशिदच्या शेजारी बसलेल्या सलमानचा चेहराच पडलेला दिसला. सलमानच्या चेहऱ्यावरील भाव स्पष्ट दिसू लागले. मात्र त्यावेळी सलमानला इच्छा असून देखील त्याला काही व्यक्त होता आले नाही. या घटनेचा व्हीडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
हेही वाचा : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर कुटुंबासह ‘शिवतीर्थ’ वर; राज ठाकरेंसह केली बाप्पाची पूजा
पाकिस्तानची कामगिरी काही महिन्यांपासून खूप ढासळत गेली आहे. पाकिस्तान संघाला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील साखळी फेरी देखील पार करता आली नाही. पाकिस्तान संघ नवख्या असलेल्या अमेरिकेकडून पराभूत झाला होता.