फोटो सौजन्य - सोशल मीडिया
अर्जेंटिना विरुद्ध पॅराग्वे : फिफा विश्वचषक पात्रता फेरी शुक्रवारी १५ नोव्हेंबर रोजी झाला. यामध्ये गुणतालिकेमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. फिफा विश्वचषक पात्रता फेरीमध्ये अर्जेंटिना विरुद्ध पॅराग्वे यांच्यामध्ये सामना झाला. या सामन्यात अर्जेंटिनाला शुक्रवारी विश्वचषक पात्रता फेरीत पॅराग्वेविरुद्ध अपसेटचा सामना करावा लागला. दक्षिण अमेरिकन विश्वचषक पात्रता लढतीत अर्जेंटिनाला पॅराग्वेकडून असुन्सिओन येथे १-२ असा पराभव पत्करावा लागला. सामन्याच्या 11व्या मिनिटाला लॉटारो मार्टिनेझने सुरुवातीचा गोल करूनही पॅराग्वेने सामन्यात पुनरागमन करत विजयी गोल केला.
क्रीडा संबंधित बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
पराग्वेच्या अँटोनियो सॅनाब्रियाने १९व्या मिनिटाला सायकल किकद्वारे बरोबरी साधणारा गोल केला. पॅराग्वेने 47व्या मिनिटाला विजयी गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला आणि फुटबॉल चाहत्यांना मोठा उलटफेर पाहायला मिळाला. पराभवानंतरही अर्जेंटिना 11 सामन्यांत 22 गुण मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. या विजयामुळे पराग्वेच्या विश्वचषकासाठी पात्र ठरण्याची शक्यता वाढली आहे कारण ते गुणतालिकेमध्ये पहिल्या पाचच्या स्थानावर जाण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे.
सामना झाल्यानंतर अर्जेंटिनाच्या मार्टिनेझ म्हणाला, ‘आम्ही कठीण परिस्थितीत आलो आहोत, जिथे राष्ट्रीय संघ नेहमीच संघर्ष करत आहे. आम्हाला आमच्या बऱ्याच चुका सुधारायच्या आहेत, पण एकंदरीत आम्ही चांगला खेळत आहोत. आम्ही अजूनही आघाडीवर आहोत आणि आम्हाला पुढे पाहायचे आहे.
लिओनेल मेस्सीने सामन्यादरम्यान रेफ्रीशी वाद घातला आहे. तो रेफ्रीकडे बोट दाखवताना आणि आक्रमक टॅकल करूनही ओमर अल्देरेटला न पाठवण्याच्या निर्णयाबद्दल निराशा व्यक्त करताना दिसला. त्याच्या या कृतीवर सोशल मीडिया यूजर्सनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या.
🚨
The ‘humble’ Lionel Messi disrespecting yet another referee.
Messi told the referee:
“You’re a coward, and I don’t like you!”
Imagine if Cristiano Ronaldo did something like this.pic.twitter.com/7UfraOMTRm
— The CR7 Timeline. (@TimelineCR7) November 15, 2024
गुणतालिकेबद्दल बोलायचं झालं तर अर्जेंटिनाचा संघ सध्या अव्वल स्थानावर आहे तर पॅराग्वेचा संघ सहाव्या स्थानावर आहे. यामध्ये अव्वल सहा जणांना अंतिम फेरीमध्ये जाण्याची संधी मिळणार आहे. पहिल्या स्थानावर अर्जेंटिनाचा संघ आहे, अर्जेंटिनाचे आतापर्यत आतापर्यत ११ सामने झाले आहेत. यामध्ये त्यांनी ७ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर दुसऱ्या स्थानावर कोलोम्बियाचा संघ आहे. कोलोम्बियाचे आतापर्यत १० सामने झाले आहेत यामध्ये त्यांनी ५ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर ४ सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे आणि एक सामना अनिर्णयीत राहिला आहे. तिसऱ्या क्रमांकावर ब्राझीलचा संघ आहे. ब्राझीलच्या संघ १७ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
चौथ्या स्थानावर उरुग्वेचा संघ आहे, उरुग्वेचे आतापर्यत १० सामने झाले आहेत यामध्ये त्यांना चार सामन्यांमध्ये विजय मिळाला आहे तर चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. २ सामने ड्रॉ झाले आहेत. पाचव्या आणि सहाव्या स्थानावर अनुक्रमे इक्वेडोर आणि पॅराग्वेचा संघ आहेत. दोन्ही संघाचे आतापर्यत ११ सामने झाले आहेत. यामध्ये इक्वेडोरने ५ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर पॅराग्वेने चार सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.