फोटो सौजन्य - इंस्टाग्राम
Paris 2024 Olympic Live Updates : पॅरिस ऑलिम्पिकचा आजचा दुसरा दिवस सुरु झाला आहे आणि आजच्या या दिवसात भारतीयांसाठी ऑलिम्पिक खेळांची मेजवानी पाहायला मिळणार आहे. भारताचे अनेक दिग्गज खेळाडू आज ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर भारताची स्टार नेमबाज मनू भाकर आजच्या पदकसाठी निशाणा लावणार आहे. त्याचबरोबर भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू काही वेळातच ॲक्शनमध्ये दिसणार आहे. भारताचे टेनिस स्टार, टेनिस दिग्गज शरथ कमल, बॉक्सिंग चॅम्पियन निखत झरीन हे खेळाडू आज लाईव्ह खेळणार आहेत.
28 Jul 2024 06:22 PM (IST)
भारताच्या हाती पदक लागले पण अन्य खेळांमध्ये निराशा हाती लागली आहे. भारताचा नंबर १ टेनिसपटू सुमित नागलला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याला फ्रान्स टेनिसपटू माऊतेतकडून २-१ असा पराभव स्वीकारावा लागला.
28 Jul 2024 05:18 PM (IST)
भारतीय टेबल टेनिसपटू मनिका बत्राने ४-१ असा विजय मिळवून पुढील फेरीत एन्ट्री केली आहे. या पहिल्याच सामन्यामध्ये मनीका बत्राने दमदार खेळ दाखवला आहे.
28 Jul 2024 04:22 PM (IST)
भारताचे नेमबाज आज कमाल करताना दिसत आहेत. भारताची स्टार मनू भाकरने शूटिंगचे पहिले पदक मिळवून इतिहास घडवला आहे. तर भारताची महिला रमिता जिंदलने रायफलमध्ये पदक मिळवले आहे. तर आता भारताचा पुरुष वैयक्तिक स्पर्धेमध्ये अर्जुन बाबूताने फायनल गाठली आहे.
28 Jul 2024 04:17 PM (IST)
भारताची स्टार बॉक्सर निखत झरीनने पहिली मॅच जिंकून चांगली सुरुवात केली आहे. पुढील मॅचमध्ये तिच्यासमोर नक्कीच आव्हान असणार आहे. निखत झरीनचा पुढील सामना चीनच्या बॉक्सरसोबत असणार आहे.
28 Jul 2024 03:57 PM (IST)
भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने कांस्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. तिने भारतासाठी कांस्यपदक जिंकले आहे. मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकले. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू ही पहिली महिला नेमबाज आहे.
MOMENT WHEN INDIA WON ITS FIRST MEDAL AT THE 2024 PARIS OLYMPICS. 🇮🇳
- Manu Bhaker, take a bow!pic.twitter.com/wD1KLhryam
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 28, 2024
28 Jul 2024 03:44 PM (IST)
भारतीय नेमबाज मनू भाकरने कालच्या क्वालिफिकेशन राउंडमध्ये तिसरे स्थान गाठून फायनल गाठली आहे. भारताची मनु भाकरने आज पहिल्या सिरीज झाल्यानंतर दुसऱ्या स्थानावर आली आहे.
28 Jul 2024 02:45 PM (IST)
भारताचा युवा टेबल टेनिस स्टार आणि भारताची नंबर १ खेळाडू श्रीजा अकुला तिच्या पहिल्या सामन्यामध्ये स्वीडिश प्लेयर क्रिस्टीना कॅलबर्ग तिच्याविरुद्ध ४-० असा विजय मिळवला आहे. पहिल्या फेरीमध्ये तिने ११-४ तर दुसऱ्या फेरीमध्ये तिने ११-९ असा खेळ जिंकला. तिसऱ्या आणि चौथ्या फेरीमध्ये ११-७ आणि ११-८ असा विजय मिळवून पुढील फेरीमध्ये प्रवेश केला आहे.
#Paris2024 #TableTennis
Sreeja Akula through to the R32 with a 4-0 win over Christina Kallberg of 🇸🇪 in the R64. pic.twitter.com/Vui57aAPv8— Rambo (@monster_zero123) July 28, 2024
28 Jul 2024 02:00 PM (IST)
महिला १० मीटर एअर रायफलमध्ये भारतीय महिला रमिता जिंदल हिने पाचवे स्थान गाठून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये ती पिछाडीवर असताना जबरदस्त कमबॅक करत तिने ६३१.५ गुण मिळवून पाचव्या स्थान गाठले. भारताची आणखी एक नेमबाज एलावेनिल वलारिवन या स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती. परंतु तिला या स्पर्धेत तिला दहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.
28 Jul 2024 01:28 PM (IST)
भारताचा रोइंगमध्ये एकमेव खेळाडू बलराज पोवारने दुसऱ्या संधीचे सोने केले आहे. त्याने रिपेचेज राउंडमध्ये त्याने दुसऱ्या स्थानावर रेस संपवून उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. त्याने ही रेस ७.१२.४१ या वेळेमध्ये संपन्न केली आहे.
Balraj Pawar qualified for the QF after finishing 2nd in repechage in men's single sculls#Rowing #Olympic2024 pic.twitter.com/W3uC4qlQue
— IndiaSportsHub (@IndiaSportsHub) July 28, 2024
28 Jul 2024 01:21 PM (IST)
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पॅरिस ऑलिम्पिकच्या पहिल्या सामन्यामध्ये सलग दोन्ही खेळ जिंकून विजयी सलामी दिली आहे. सिंधूने मालदिवच्या नबाह अब्दुल रज्जाक हिला २१-९ आणि २१-६ असे पराभूत केले आहे.
28 Jul 2024 01:07 PM (IST)
पीव्ही सिंधू पहिल्या सामान्यामधील पहिल्या खेळत एकतर्फी विजय. सामना जिंकण्यासाठी आणखी खेळ जिंकण्याची आवश्यक्यता.
28 Jul 2024 12:12 PM (IST)
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू पॅरिस ऑलिम्पिकचा पहिला सामना खेळणार आहे. आजचा हा सामना १२.५० मिनिटांनी मालदीवची नबाह अब्दुल रज्जाक हिच्यासोबत JIO Cinema वर भारतीय प्रेक्षकांना पाहता येणार आहे. त्याचबरोबर रोइंग स्पर्धेमधील भारताचा एकमेव खेळाडू बलराज पनवर आज पॅरिसमध्ये ॲक्शनमध्ये असणार आहे.
28 Jul 2024 10:54 AM (IST)
भारताच्या महिला तिरंदाज संघ आज उपांत्य पूर्व फेरीमध्ये खेळणार आहे. यामध्ये भारताच्या संघाने उपांत्य पूर्व फेरीमध्ये जिंकल्यास टीम इंडियाच्या महिला तिरंदाज सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. हे सामने संध्याकाळी ५.४५ पासून सुरु होणार आहेत. तर भारताची नेमबाज मनू भाकर ही आज फायनल खेळणार आहे. त्यामुळे तिच्याकडून पदकाची अपेक्षा आहे.
28 Jul 2024 10:50 AM (IST)
खेळ | वेळ | खेळाडू |
१० मीटर रायफल शूटिंग क्वालिफिकेशन | 12:45 | रमिता जिंदल |
इलवेनिल वलारिवान | ||
बॅडमिंटन | 12:50 | पीव्ही सिंधू |
रोईंग | 13:06 | बलराज पनवर |
टेबल टेनिस महिला वैयक्तिक स्पर्धा | 14:15 | श्रिजा अकुला |
स्विमिंग पुरुष १०० मीटर बॅकस्ट्रोक | 14:30 | श्रीहरी नटराजन |
स्विमिंग महिला २०० मीटर फ्रीस्टाईल | 14:30 | धिनिधी देशिंगू |
शूटिंग १० मीटर एअर रायफल | 14:45 | संदीप सिंह |
अर्जुन बबुता | ||
टेबल टेनिस पुरुष वैयक्तिक स्पर्धा | 15:00 | शरथ कमल |
महिला शूटिंग १० मीटर एअर पिस्तूल फायनल | 15:30 | मनू भाकर |
टेनिस | 15:30 | सुमित नागल |
बॉक्सिंग | 15:50 | निखत झरीन |
टेबल टेनिस महिला वैयक्तिक स्पर्धा | 16:30 | मनिका बत्रा |
तिरंदाजी महिला संघ क्वार्टर फायनल | 17:45 | दीपिका कुमारी |
अंकिता भकत | ||
भजन कौर | ||
तिरंदाजी महिला संघ सेमी फायनल | 19:17 | क्वार्टर फायनल विजेता |
बॅडमिंटन | 20:00 | एचएस प्रणॉय |
तिरंदाजी महिला संघ ब्राँझ मेडल मॅच | 20:18 | सेमी फायनल पराभूत संघ |
तिरंदाजी महिला संघ गोल्ड मेडल मॅच | 20:41 | सेमी फायनल विजेते संघ |