
फोटो सौजन्य - इंस्टाग्राम
भारताचे बॉक्सर लवकरच ॲक्शनमध्ये दिसणार आहेत. आज २६ जुलै रोजी पॅरिस ऑलिम्पिकचा ऐतिहासिक उद्घाटन सोहळा रंगणार आहे. यामध्ये भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि दिग्गज टेबल टेनिसपटू भारताचे नेतृत्व करणार आहेत. २५ जुलै रोजी भारताच्या तिरंदाजांनी दमदार कामगिरी करत ऑलिम्पिकमध्ये महिला तिरंदाजांनी चौथे स्थान गाठून उपांत्य पूर्व फेरी गाठली आहे. तर पुरुष तिरंदाज संघाने तिसरे स्थान गाठून क्वाटर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय प्रेक्षक खरी वाट २७ जुलैची पाहत आहे. कारण उद्यापासून म्हणजेच २७ जुलै पासून भारताचा खेळाडू ॲक्शनमध्ये दिसणार आहेत. भारताचे बॅडमिंटनपटू, बॉक्सर उद्या पॅरिसमध्ये खेळणार आहेत. भारताच्या बॉक्सरबद्दल बोलायचं झालं तर ४ महिला बॉक्सर आणि दोन पुरुष बॉक्सर पॅरिसमध्ये खेळणार आहेत.
भारताची स्टार बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेन हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवले होते. भारताची स्टार बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेन हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवले होते. त्याचबरोबर वर्ल्ड चॅम्पियन निखत झरीन सुद्धा खेळताना दिसणार आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे सहा बॉक्सर सहभागी होत असून त्यांना चुरशीची बरोबरी मिळाली आहे. यापैकी निखत जरीन पदकाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. या २८ वर्षीय खेळाडूला ५० किलो वजनी गटात चीनची वू यू, थायलंडची चुथामात रकसात आणि उझबेकिस्तानची सबिना बोबोकुलोव्ह यांच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. जरीन रविवारी जर्मनीच्या मॅक्सी क्लोत्झरविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. यानंतर त्याचा सामना आशियाई क्रीडा स्पर्धेतील अव्वल मानांकित आणि सध्याच्या फ्लायवेट विश्वविजेत्या वूशी होऊ शकतो. जरीनने या अडथळ्यावर मात केल्यास तिला आठव्या मानांकित आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक विजेती रकसत किंवा बोबोकुलोवाचा सामना करावा लागू शकतो. या दोन्ही बॉक्सर्सनी नुकतेच भारतीय खेळाडूचा पराभव केला होता.
| तारीख | बॉक्सरचे नाव | कोणाशी होणार सामना |
| 27 जुलै | लोव्हलिना बोरगोहेन | सुनिव्हा हॉफस्टॅड |
| 27 जुलै | निखत झरीन | वू यू (चीन) |
| 27 जुलै | निशांत देव | जोसे रॉड्रिग्ज (पोर्तो रिकन) |
| 27 जुलै | प्रीती | व्हिएतनाम बॉक्सर |
| 27 जुलै | अमित पांघल | डॅनियल |
| 27 जुलै | जास्मिन | फिलीपिन्स बॉक्सर |