Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Youth Olympics : यूथ ऑलिम्पिकमध्ये भारताचा पहिला बॉक्सिंग गोल्ड! अंबेकर मीतेईचा ऐतिहासिक ‘गोल्डन पंच’

Youth Olympics : यूथ ऑलिम्पिक 2026 मध्ये मणिपूरच्या अंबेकर मीतेईने आयर्लंडच्या बॉक्सरला 3-2 ने हरवत भारतासाठी बॉक्सिंगमधील पहिले ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 13, 2026 | 04:38 PM
Youth Olympics : यूथ ऑलिम्पिकमध्ये भारताचा पहिला बॉक्सिंग गोल्ड! अंबेकर मीतेईचा ऐतिहासिक 'गोल्डन पंच'

Youth Olympics : यूथ ऑलिम्पिकमध्ये भारताचा पहिला बॉक्सिंग गोल्ड! अंबेकर मीतेईचा ऐतिहासिक 'गोल्डन पंच'

Follow Us
Follow Us:
  • अंबेकर मीतेईची ऐतिहासिक कामगिरी
  • शिव थापाच्या रौप्यपदकानंतर भारताला पहिले सुवर्ण
  • अंतिम फेरीपर्यंतचा प्रवासही दमदार
Youth Olympics : समर यूथ ऑलिम्पिक 2026 मध्ये भारतीय बॉक्सर लैरेनलाकपाम अंबेकर मीतेई याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पुरुषांच्या 50 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात मणिपूरच्या या युवा बॉक्सरने आयर्लंडच्या क्रिस्टियन जुबानी याचा 3-2 असा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले. यूथ ऑलिम्पिकच्या इतिहासात बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारा अंबेकर हा पहिला भारतीय बॉक्सर ठरला आहे.

अंतिम सामना अंबेकरसाठी सुरुवातीला आव्हानात्मक ठरला. पहिल्या फेरीत पाचही पंचांनी आयर्लंडच्या जुबानीच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे भारतीय बॉक्सरवर दडपण निर्माण झाले होते. मात्र, अंबेकरने हार न मानता दुसऱ्या फेरीत जोरदार पुनरागमन केले. या फेरीत पाचपैकी तीन पंचांनी त्याच्या बाजूने निर्णय दिला.

तिसऱ्या आणि निर्णायक फेरीत अंबेकरने आपला खेळ आणखी उंचावला. पाचपैकी चार पंचांनी त्याच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे एकूण 3-2 अशा फरकाने त्याने अंतिम सामना जिंकत ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले.

अंबेकरच्या या विजयामुळे डकार यूथ ऑलिम्पिकमध्ये भारताचे सुवर्णपदकाचे खातेही उघडले. यापूर्वी भारतीय खेळाडूंनी कुस्ती, जलतरण यांसह विविध क्रीडा प्रकारांत तीन रौप्य आणि पाच कांस्यपदके जिंकली होती.

अंतिम फेरीपर्यंतचा प्रवासही दमदार

अंबेकरचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवासही प्रभावी ठरला. त्याने नामिबियाच्या अब्राहम कालेन्गा याच्याविरुद्ध दमदार विजय मिळवत स्पर्धेची सुरुवात केली. पहिल्या फेरीत 1 मिनिट ५७ सेकंदांवर रेफरी स्टॉप्स कॉन्टेस्ट (RSC) नियमानुसार त्याला विजयी घोषित करण्यात आले.

त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत त्याने सेनेगलच्या फे शेख इब्राहिमा फॉल याचा ५-० असा एकतर्फी पराभव केला. उपांत्य फेरीतही त्याने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. कोलंबियाच्या इजोन जेफरी गॅलिया अरेवालो याला ५-० अशा फरकाने पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी टीम इंडियासाठी गूड न्यूज! Rishabh Pant कमबॅकसाठी सज्ज; BCCI कडून ग्रीन सिग्नल

शिव थापाच्या रौप्यपदकानंतर भारताला पहिले सुवर्ण

यूथ ऑलिम्पिकमधील भारतीय बॉक्सिंगचा इतिहास पाहिला तर 2010 मध्ये सिंगापूर येथे झालेल्या पहिल्या यूथ ऑलिम्पिकमध्ये शिव थापाने पुरुषांच्या 54 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले होते. त्याच स्पर्धेत विकास कृष्णनने पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात कांस्यपदक मिळवले होते.

आता अंबेकर मीतेईने या दोघांच्या कामगिरीच्या पुढे एक पाऊल टाकत यूथ ऑलिम्पिकमध्ये भारताला बॉक्सिंगमधील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारतीय बॉक्सिंगच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

National Sports Awards : दिव्या देशमुख, तेजस्विन शंकरचा राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने सन्मान; 17 खेळाडूंचा गौरव

💡

Frequently Asked Questions

  • Que: यूथ ऑलिम्पिक 2026 मध्ये भारतासाठी बॉक्सिंगचे पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले?

    Ans: मणिपूरचा युवा बॉक्सर लैरेनलाकपाम अंबेकर मीतेई याने भारतासाठी पहिले बॉक्सिंग सुवर्णपदक जिंकले.

  • Que: अंबेकर मीतेईने अंतिम सामन्यात कोणाचा पराभव केला?

    Ans: त्याने आयर्लंडच्या क्रिस्टियन जुबानी याचा 3-2 असा पराभव केला.

  • Que: अंबेकर मीतेई कोणत्या वजनी गटात खेळला?

    Ans: त्याने पुरुषांच्या 50 किलो वजनी गटात सहभाग घेतला होता.

Web Title: Youth olympics 2026 ambekar meitei first indian boxing gold rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • 2028 Olympics
  • indian boxer
  • Manipur

संबंधित बातम्या

Harry Boxer : लॉरेन्स बिश्नोईचा उजवा हात हॅरी बॉक्सरला अमेरिकेत केली अटक; भारतात आणण्याची तयारी सुरु
1

Harry Boxer : लॉरेन्स बिश्नोईचा उजवा हात हॅरी बॉक्सरला अमेरिकेत केली अटक; भारतात आणण्याची तयारी सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.