फोटो सौजन्य - KolkataKnightRiders
Punjab Kings vs Kolkata Knight Riders : सामना क्रमांक ३१ वा हा उद्या म्हणजेच १५ एप्रिल रोजी खेळवला जाणार आहे. आयपीएल २०२५ मधील ३१ वा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला जाणार आहे. शेवटच्या सामन्यात केकेआरने सीएसकेला हरवून शानदार कामगिरी केली. आता कोलकाता नाईट राइडर्सचे लक्ष पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यावर आहे. पंजाबविरुद्ध केकेआरच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल होऊ शकतो.
क्विंटन डी कॉक आणि सुनील नारायण सलामीवीर म्हणून डावाची सुरुवात करू शकतात. सीएसके विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात डी कॉकने २३ धावांची खेळी केली. याशिवाय, नरेननेही चमकदार कामगिरी केली. नारायणने १८ चेंडूत ४४ धावांची खेळी केली. पंजाबविरुद्धही दोन्ही फलंदाजांना सलामी जोडी म्हणून पाहिले जाऊ शकते. कर्णधार अजिंक्य रहाणे तिसऱ्या क्रमांकावर जबाबदारी सांभाळू शकतो. रहाणेने आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये शानदार फलंदाजीही केली आहे. त्याने शेवटच्या सामन्यात नाबाद २० धावा केल्या. याशिवाय रिंकू सिंगनेही १२ चेंडूत १५ धावांची खेळी केली.
खालच्या मधल्या फळीत व्यंकटेश अय्यरच्या जागी मनीष पांडेला संधी मिळण्याची अपेक्षा आहे. पांडे हा विराट कोहलीचा जवळचा मित्र आहे. दोघांनीही २००८ च्या अंडर-१९ विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्याच्याशिवाय, रमनदीप, मोईन अली आणि आंद्रे रसेल हे फिनिशरच्या भूमिकेत दिसू शकतात. फिरकी गोलंदाजी विभागाची जबाबदारी वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायण यांच्यावर असू शकते. सीएसके विरुद्ध, नरेनने ३ विकेट्स घेतल्या, तर चक्रवर्तीने २ विकेट्स घेतल्या. रमणदीप, हर्षित राणा आणि वैभव अरोरा हे वेगवान गोलंदाजीमध्ये दिसू शकतात.
पंजाब किंग्सचा संघ ६ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे, संघाने आतापर्यत ५ सामने खेळले आहेत यामध्ये त्यांना २ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे तर ३ सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळाला आहे. कोलकाता नाईट राइडर्सचा संघ सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. संघाचे ५ गुण आहेत पण त्यांचा रनरेट चांगला आहे. संघाने आतापर्यत ६ सामने खेळले आहेत यामध्ये त्यांना ३ सामन्यांमध्ये विजय मिळाला आहे आणि ३ सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), मनीष पांडे, रिंकू सिंग, मोईन अली, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.