फोटो सौजन्य - Mufaddal Vohra
Kicking and punching brawl between fans during DC vs MI match : आयपीएल २०२५ चा एकोणतीसवा सामना रविवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला या हंगामातील पहिला पराभव पत्करावा लागला. मुंबई इंडियन्सने दिल्लीचा १२ धावांनी पराभव करून आपला स्पर्धेतील दुसरा विजय नोंदवला. कालचा सामना हा सिनेमाहुन कमी नव्हता. १३ ओव्हर पर्यत असे वाटत होते की मुंबई इंडियन्सच्या हातातून सामना निसटला आहे पण त्यानंतर कर्ण शर्मा गोलंदाजी दिली त्याने संघासाठी विकेट काढले.
कालच्या सामन्यांमध्ये करुण नायरने संघासाठी करून दाखवली पण तो संघाला विजयापर्यत नेऊ शकला नाही. सामन्यादरम्यान, मुंबईचा गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि दिल्लीचा फलंदाज करुण नायर यांच्यात थोडासा वाद झाला, तर गॅलरीत चाहत्यांमध्ये हाणामारीही झाली.
IPL 2025 : अंपायरने हार्दिक पांड्याला अचानक का थांबवलं? खेळाडूची तपासली बॅट! मोठे कारण आले समोर
जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण
दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील सामन्यादरम्यान अरुण जेटली स्टेडियमवर चाहत्यांमध्ये जोरदार हाणामारी पाहायला झाली. यादरम्यान लोक एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसले. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सुमारे ४८ सेकंदांपर्यंत एक महिला आणि एक पुरूष एका व्यक्तीला मारहाण करत असल्याचे दिसून येते, त्यानंतर तो पुरूष त्यांना ढकलतो आणि दोघेही पडतात. दरम्यान, निळा टी-शर्ट घातलेला एक माणूस एका वृद्ध माणसाशी झटापट करतो.
A heated moment between Karun Nair and Jasprit Bumrah. pic.twitter.com/vGtcijbb1E
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 13, 2025
नंतर इतर लोक येऊन परिस्थिती शांत करतात आणि महिलेला उचलतात. मग सुरक्षा रक्षक तिथे येतात आणि सर्वजण आपापल्या जागी बसतात. तथापि, चाहत्यांमध्ये भांडण कशामुळे झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या सामन्यादरम्यान मुंबईचा गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि दिल्लीचा फलंदाज करुण नायर यांच्यात वाद झाला. खरंतर, नायर मुंबईच्या गोलंदाजांना चांगलेच फटकावत होता.
A fight between fans at the Arun Jaitley stadium last night. pic.twitter.com/UYXmAZbg1c
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 14, 2025
जेव्हा नायर ४८ धावांवर होता तेव्हा त्याने बुमराहच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेतल्या आणि त्याचे अर्धशतक पूर्ण केले. पण, दुसऱ्या धावण्याच्या दरम्यान, नायर बुमराहशी टक्करला, जे बुमराहला अजिबात आवडले नाही. मग ड्रिंक्स ब्रेक दरम्यान दोघांमध्ये थोडा वाद झाला. बुमराहने करुणला सांगितले की, तू जिथे धावलास ती जागा माझी आहे. यानंतर करुणनेही बुमराहला उत्तर दिले. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आला आणि त्याने दोघांनाही वेगळे राहण्याचा सल्ला दिला, ज्यामुळे प्रकरण शांत झाले. रोहित शर्माही बाजूने काहीतरी बोलताना दिसला.