PCB: पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ! महिला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये फक्त ८ जणींना संधी, १२ अनुभवी खेळाडूंचा पत्ता कट

PCB slashes women's central contracts from 20 to 8: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २०२६-२७ हंगामासाठी आपल्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा केली आहे. यामध्ये केवळ आठ महिला क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे.
PCB slashes women's central contracts
PCB slashes women's central contractsphoto- social media
Published on: 
Updated on: 
  • पाकिस्तानच्या महिला क्रिकेटपटूंना मोठा धक्का

  • महिला क्रिकेटपटूंची नवी करार यादी जाहीर

  • १२ खेळाडू बाहेर, नव्या यादीत फक्त ८ जणी

PCB: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) महिला क्रिकेट संघाच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. बोर्डाने नवीन हंगामासाठी खेळाडूंची संख्या मोठ्या प्रमाणात कमी केली आहे.

बोर्डाने २० ऐवजी केवळ आठ खेळाडूंचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश करण्यात आला आहे. या नवीन यादीतून नेक प्रमुख आणि अनुभवी १२ खेळाडूंना वगळण्यात आले आहे. यावेळी फातिमा सना आणि सादिया इक्बाल यांचा सर्वोच्च श्रेणी, 'श्रेणी अ' मध्ये समावेश करण्यात आला आहे.

फक्त ८ खेळाडूंचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश

पीसीबीने २०२६-२७ हंगामासाठी २७ नोव्हेंबर रोजी, नवीन सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा केली. हे करार १ जुलै २०२६ पासून लागू होतील आणि ३० जून २०२७ पर्यंत चालतील. विशेष म्हणजे, मंडळाने श्रेणी डी आणि श्रेणी ई पूर्णपणे रद्द केल्या आहेत.

पीसीबीने जाहीर केलेल्या नवीन यादीत खेळाडूंची तीन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. फातिमा सना आणि सादिया इक्बाल यांचा 'अ' गटात समावेश आहे. मुनीबा अली सिद्दिकी, नशरा संधू आणि सिद्रा अमीन यांना 'ब' गटात ठेवण्यात आले आहे. आयेशा जफर, गुल फिरोजा आणि सदफ शमास यांना 'क' गटात ठेवण्यात आले आहे.

या हंगामात काही खेळाडूंच्या श्रेणीही बदलल्या आहेत. मुनिबा अली आणि सिद्रा अमीन यांना गेल्या हंगामात 'अ' श्रेणीत ठेवण्यात आले होते, पण आता त्यांना 'ब' श्रेणीत हलवण्यात आले आहे. दुसरीकडे, गुल फिरोझा आणि सदफ शमास 'ड' श्रेणीतून 'क' श्रेणीत गेल्या आहेत. आयेशा जफरने पहिल्यांदाच सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मिळवला आहे.

PCB slashes women's central contracts
India A tour of Nepal: रायझिंग स्टार्समधून बाहेर, आता Team India निघणार नेपाळ दौऱ्यावर! कधी अन् कुठे भिडणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक

१२ खेळाडूंना मिळाला डच्चू

पीसीबीच्या नवीन करार यादीतून तेरा खेळाडूंना वगळण्यात आले आहे. यामध्ये आलिया रियाझ, डायना बेग, रमीम शमीम, नाझिहा अल्वी, नतालिया परवेझ, ओमैमा सोहेल, सिद्रा नवाझ, सय्यदा अरूब शाह, तुबा हसन, उम्म-ए-हानी आणि वाहिदा अख्तर यांचा समावेश आहे. युवा खेळाडू इमान फातिमा आणि शवाल झुल्फिकार यांनाही यावेळी केंद्रीय करार मिळालेले नाहीत.

पीसीबीने सांगितले की, खेळाडूंची श्रेणी निश्चित करताना त्यांची अलीकडील कामगिरी, तंदुरुस्ती आणि संघाच्या भविष्यातील गरजा विचारात घेतल्या गेल्या. नवीन करार ३० जून २०२७ पर्यंत प्रभावी राहतील. मंडळाने हे देखील स्पष्ट केले की, सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मिळवणाऱ्या सर्व खेळाडूंना त्यांच्या कराराच्या कालावधीत नियमित तंदुरुस्ती चाचण्या देणे आणि विहित तंदुरुस्ती मानके राखणे बंधनकारक असेल.

पाकिस्तान महिला संघाचा केंद्रीय करार २०२६-२७

  • श्रेणी अ: फातिमा सना, सादिया इक्बाल

  • श्रेणी ब: मुनीबा अली सिद्दीकी, नशरा सुंधू, सिद्रा अमीन

  • श्रेणी क: आयेशा जफर, गुल फिरोजा, सदफ शमास

PCB slashes women's central contracts
IND vs NZ: एका खेळीत विक्रमांची रांगच पार! केन विल्यमसनला पछाडलं, कोहलीलाही टाकलं मागे; Tom Lathamची WTC मध्ये ऐतिहासिक कामगिरी