Pak Afghan War: PCB reaches the pinnacle of shamelessness; After the death of Afghan players, they said, "Considering transfer...",
Pak Afghan War, PCB’s big decision : अफगाणिस्तान क्रिकेटवर मोठी शोककळा पसरली आहे. पाकिस्ताननकडून अफगाणिस्तानवर करण्यात आलेल्या मोठा हवाई हल्ल्यात अफगाणिस्तान क्रिकेट संघातील तीन खेळाडूंसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानविरुद्धच्या तिरंगी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानने माघार घेतल्यानंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खालची पातळी गाठून एक मोठा निर्णय घेतला आहे. पीसीबीकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, १७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान लाहोरमध्ये टी-२० स्वरूपात खेळवण्यात येणारी तिरंगी मालिका सुरूच राहणार आहे. पीसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की ते इतर बोर्डांशी याबाबत चर्चा सुरू आहे.
पीटीआयनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून शनिवारी घोषणा करण्यात आली की, अफगाणिस्तानने माघार घेतली असली तरी, १७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान लाहोरमध्ये तिरंगी टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. पीसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की आमची अफगाणिस्तानऐवजी बदली संघाचा समावेश करण्यासाठी इतर बोर्डांशी चर्चा सुरू आहे. मालिकेतील श्रीलंकेचा तिसरा संघ म्हणून सहभाग आहे.
पीसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “अफगाणिस्तान संघ जरी खेळला नाही तरी मालिका वेळेवरच होणार आहे. आम्ही आता बदली संघाच्या शोधात आहोत आणि अंतिम झाल्यानंतर त्याची घोषणा करण्यात येईल. तिसरा संघ श्रीलंकेचा आहे आणि स्पर्धा १७ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.”
पक्तिका प्रांतात पाकिस्तकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात तीन क्रिकेटपटूंच्या मृत्युनंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने संघ न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. कसोटी दर्जा मिळाल्यापासून अफगाणिस्तान संघाने श्रीलंकेसोबत द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही, त्यांच्या अ संघाकडून पाकिस्तानचा दौरा केला आहे.
पक्तिका येथे तीन अफगाण क्रिकेटपटूंच्या हत्येनंतर अफगाणिस्तानकडून पाकिस्तानशी संबंधित आगामी तिरंगी टी-२० मालिकेतून माघार घेतली आहे आणि त्याला “पाकिस्तानी राजवटीने रचलेला भ्याड हल्ला” असे म्हटले आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एक निवेदन प्रसिद्ध केले. त्यात म्हटले आहे की, प्रांतीय राजधानी शराणा येथे एक मैत्रीपूर्ण सामाना खेळून परतत असताना पक्तिका प्रांतातील अर्गुन जिल्ह्यात पाच जणांसह मृत्युमुखी पडलेल्या त्यांच्या खेळाडू कबीर, सिबगतुल्लाह आणि हारून यांच्या शहीदतेबद्दल त्यांना खूप दुःख झाले आहे. तसेच या घटनेत इतर सात जण जखमी झाले आहेत.
एसीबीने एका निवेदनात म्हटले आहे की, “अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड पक्तिका प्रांतातील अर्गुन जिल्ह्यात आपल्या शूर क्रिकेटपटूंच्या शहीदांबद्दल तीव्र शोक व्यक्त करतो. पाकिस्तानी राजवटीने केलेल्या भ्याड हल्ल्यात त्यांना लक्ष्य करण्यात आले.”