Cricket News: निकिता सिंगची 80 रन्सची तुफानी खेळी अन्...; ऑक्सिरीच करंडकच्या फायनलमध्ये 'हे' संघ

Cricket News: दुसऱ्या सामन्यात निहीरा शर्मा हिने केलेल्या ६८ धावांच्या जोरावर क्रिक फिटनेट ॲकॅडमीने मॅव्हरीक्स्‌ ॲकॅडमीचा ८ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मॅव्हरीक्स्‌ ॲकॅडमीने २० षटकात १२२ धावा धावफलकावर लावल्या.
रावेत येथील चॅम्पियन्स्‌ एरिना मैदानावर सेमीफायनल सामना
‘ऑक्सिरीच करंडक‌’ (फोटो- सोशल मिडिया)
Published on: 
Updated on: 
  •  क्रिक फिटनेट आणि व्हेरॉक वेंगसकर भिडणार

  • ‘ऑक्सिरीच करंडक‌’ महिला आंतरक्लब टी-२० क्रिकेट स्पर्धा

  • रावेत येथील चॅम्पियन्स्‌ एरिना मैदानावर सेमीफायनल सामना

Cricket News: पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित ‘ऑक्सिरीच करंडक‌’ महिला आंतरक्लब खुल्या गटाच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत क्रिक फिटनेट ॲकॅडमी आणि व्हेरॉक वेंगसकर क्रिकेट ॲकॅडमी या संघांनी अंतिम फेरी गाठली. रावेत येथील चॅम्पियन्स्‌ एरिना मैदानावर झालेल्या या उपांत्य फेरीच्या (PCMC) सामन्यात निकीता सिंग हिने केलेल्या नाबाद ८० धावांच्या जोरावर व्हेरॉक वेंगसकर क्रिकेट ॲकॅडमीने स्कोअर स्पोर्ट्‌स ॲकॅडमीचा ४८ धावांनी पराभव केला.

पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या व्हेरॉक वेंगसकर ॲकॅडमीने १९६ धावांचे लक्ष्य उभे केले. निकीता सिंग हिने ४५ चेंडूत १३ चौकार आणि १ षटकारांसह नाबाद ८० धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजुने मेहक मुल्ला (४२ धावा) आणि बिनीता भट (नाबाद ३९ धावा) यांनी उत्तम साथ दिली. यावेळी स्कोअर स्पोर्ट्‌स ॲकॅडमीचा डाव २० षटकात १४८ धावांवर मर्यादित राहीला. आर्या चिखलीकर हिने ६० धावांची खेळी केली. अवनी पाटील हिने तीन गडी तर, वैभवी कुलकर्णी हिने दोन गडी बाद करून संघाचा विजय सोपा केला.

Cricket News: मैदानावर जय बिस्ताचा धुमाकूळ; 77 रन्स अन्...; 'या' संघाचा दणदणीत पराभव

दुसऱ्या सामन्यात निहीरा शर्मा हिने केलेल्या ६८ धावांच्या जोरावर क्रिक फिटनेट ॲकॅडमीने मॅव्हरीक्स्‌ ॲकॅडमीचा ८ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मॅव्हरीक्स्‌ ॲकॅडमीने २० षटकात १२२ धावा धावफलकावर लावल्या. आयेश शेख (३६ धावा) आणि पायल पवार (३० धावा) यांनी संघाचा डाव उभा केला. हे लक्ष्य क्रिक फिटनेट ॲकॅडमीने १७.३ षटकात व २ गडी गमावून पूर्ण केले. निहीरा शर्मा हिने ६८ धावांची तर, राशी व्यास हिने ३८ धावांची खेळी केली. या दोघींनी ९० चेंडूत १०८ धावांची सलामी देत संघाचा विजय निश्चित केला.

उपांत्य सामन्यांचा संक्षिप्त निकाल

व्हेरॉक वेंगसकर क्रिकेट ॲकॅडमीः २० षटकात २ गडी बाद १९६ धावा (निकीता सिंग नाबाद ८०, मेहक मुल्ला ४२, बिनीता भट नाबाद ३९, आराध्या पवार २९, आर्या चिखलीकर १-२२) वि.वि. स्कोअर स्पोर्ट्‌स ॲकॅडमीः २० षटकात ५ गडी बाद १४८ धावा, आर्या चिखलीकर ६०, मृणाल खोत ३०, अमानी नदाल २०, गायत्री हांडे नाबाद २०, अवनी पाटील ३-२५, वैभवी कुलकर्णी २-१७); सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूः निकीता सिंग

पुण्याच्या क्रिकेट मैदानात MES क्लबचा दबदबा! अभिषेक ठाकुर करंडक स्पर्धेत विजयांची हॅट्ट्रिक

मॅव्हरीक्स्‌ ॲकॅडमीः २० षटकात ७ गडी बाद १२२ धावा (आयेश शेख ३६, पायल पवार ३०, नाव्या दुबे २-१५, अनिका मिश्रा २-३३) पराभूत वि. क्रिक फिटनेट ॲकॅडमीः १७.३ षटकात २ गडी बाद १२३ धावा (निहीरा शर्मा ६८, राशी व्यास ३८,, साची अदवडे १-११); (भागिदारीः पहिल्या गड्यासाठी निहीरा आणि राशी यांच्यात १०८ (९०); सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूः निहीरा शर्मा.

Q

ऑक्सिरीच करंडक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोणत्या संघांनी प्रवेश केला?

A

ऑक्सिरीच करंडक महिला आंतरक्लब टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत क्रिक फिटनेस ॲकॅडमी आणि व्हेरॉक वेंगसकर क्रिकेट ॲकॅडमी या संघांनी प्रवेश केला.

Q

व्हेरॉक वेंगसकर क्रिकेट ॲकॅडमीच्या विजयात निकीता सिंगचे योगदान काय होते?

A

निकीता सिंगने नाबाद ८० धावांची शानदार खेळी केली. तिच्या या खेळीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसकर क्रिकेट ॲकॅडमीने स्कोअर स्पोर्ट्स ॲकॅडमीचा ४८ धावांनी पराभव केला.

रावेत येथील चॅम्पियन्स्‌ एरिना मैदानावर सेमीफायनल सामना
Cricket News: मैदानावर जय बिस्ताचा धुमाकूळ; 77 रन्स अन्...; 'या' संघाचा दणदणीत पराभव