PHOTOS: Gill sets new records on English soil; These legends, including Prince, score more than 700 runs in the India-England series.
मँचेस्टर कसोटीत भारताच्या दुसऱ्या डावात भारतचा कर्णधार शुभमन गिलने मँचेस्टर कसोटीत 74 धावा करताच विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढला आहे. सेना देशांमध्ये मालिकेत आशियाई फलंदाज म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नवे जमा होता. त्याच वेळी, मँचेस्टर कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावा गिलने विराट कोहलीला मागे टाकले आहे..
तथापि, कर्णधार गिल हा इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत ७०० पेक्षा अधिक धावा करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. त्याने भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत ४ शतकं लागवली आहेत. या मालिकेत गिल शानदार कामगिरी करताना दिसत आहे. भारत-इंग्लंड कसोटी मालिकेमध्ये ७००+ धावा करणाऱ्या चार क्रिकेटपटूंची माहिती खालील प्रमाणे.
ग्राहम गूच - ७५२ (१९९०) : इंग्लंडचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार ग्राहम गूचने १९९० च्या भारत-इंग्लंड कसोटी मालिके दरम्यान तीन सामने खेळले होते. यामध्ये त्याने एक त्रिशतक, दोन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली होती. त्याने एकूण ७५२ धावा फटकावल्या होत्या. या मालिकेतील लॉर्ड्स कसोटी सामन्यात, गूचने एकूण ४५६ धावा (३३३ आणि १२३) केल्या होत्या, जो कोणत्याही फलंदाजाने एका कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम केला आहे.
जो रूट - ७३७ धावा (२०२१-२२) : २०२१-२२ मध्ये भारताविरुद्ध इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटने इंग्लंड संघाचा कर्णधार असताना त्याने चार शतके आणि एका अर्धशतकाच्या मदतीने एकूण ७३७ धावा कुटल्या होत्या.
यशस्वी जयस्वाल -७१२ धावा (२०२४) : भारताचा फलंदाज यशस्वी जयस्वालने २०२४ च्या भारत-इंग्लंड कसोटी मालिके दरम्यान पाचही सामने खेळले होते. या मालिकेत त्याने एकूण ७१२ धावा केल्या होत्या. त्या मालिकेत, जयस्वालने दोन द्विशतके आणि तीन अर्धशतके झळकावली होती.
शुबमन गिल -७००* धावा (२०२५) : शुभमन गिल हा भारतीय संघाचा कर्णधार आहे. त्याने त्याच्या कर्णधारपदाच्या पहिल्या कसोटी मालिकेमध्ये ७०० धावा काढल्या आहेत. इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या या कसोटी मालिकेत ७०० धावा करणारा गिल हा पहिला भारतीय फलंदाज आहे .