PHOTOS: Do you know the top 5 wicket-takers in Asia Cup T20? Find out
भुवनेश्वर कुमार : भारताचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे नाव या यादीत पहिल्या स्थानी येते. या भारतीय वेगवान गोलंदाजाने २०१६ ते २०२२ दरम्यान टी२० स्वरूपात सहा सामने खेळलेले आहेत. या ६ सामन्यांमध्ये भुवनेश्वर कुमारने एकूण २३ षटके टाकली. या दरम्यान त्याने १३ बळी टिपले आहेत.
अमजद जावेद : यूएईचा गोलंदाज अमजद जावेदचा यादीत दुसरा नंबर लागतो. २०१६ मध्ये युएईच्या या गोलंदाजाने टी२० फॉरमॅटचा आशिया कप खेळला. त्याने सात सामन्यांमध्ये १४.०८ च्या सरासरीने १२ विकेट्स मिळवल्या. या दरम्यान त्याने २३ षटके टाकून १३८ धावा मोजल्या.
मोहम्मद नवीद : मोहम्मद नवीद या यूएईच्या गोलंदाजाने यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. युएईच्या या खेळाडूने सात सामन्यांमध्ये एकूण २७.४ षटके टाकून, ११ विकेट्स घेतल्या तर एकूण १६६ धावा दिल्या आहेत.
रशीद खान : अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज रशीद खानने २०१६ ते २०२२ दरम्यान आठ सामने खेळले आहेत. त्याने एकूण ३१ षटके टाकली. या दरम्यान रशीद खानने ११ विकेट्स घेतल्या आहेत.
हार्दिक पंड्या : हार्दिक पंड्याने २०१६ ते २०२२ दरम्यान आशिया कपच्या या फॉरमॅटमध्ये एकूण आठ सामने खेळले आहेत, त्याने १८.८१ च्या सरासरीने ११ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान, पंड्याने एकूण २९.३ षटके टाकून विरोधी फलंदाजांना १७७ धावा दिल्या आहेत.
अल-अमीन हुसेन : बांगलादेशच्या अल-अमीन हुसेन या गोलंदाजाने पाच सामन्यांमध्ये १२.१८ च्या सरासरीने ११ बळी घेतले आहेत. यादरम्यान, त्याने १६.५ षटके टाकली आणि एकूण १०१ धावा मोजल्या आहेत.