Mohammad Amir, Asia Cup 2025 Final : रविवारी, २८ सप्टेंबर रोजी आशिया कप स्पर्धेचा अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आलेत. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करून जेतेपद पटकावले. या पराभवामुळे पाकिस्तानी चाहते आणि माजी पाकिस्तानी खेळाडू अजून देखील दुःखात आहेत. अशातच पाकिस्तानचा दिग्गज माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने थरथरत्या आवाजात आपले दुःख सर्वांसमोर मांडले आहे. सोशल मीडियावर आपले दुःख मांडताना व्यक्त करताना, मोहम्मद आमिर म्हणाला की, “यार, हे खूप झाले. मला अजूनही समजत नाहीये की नेमके काय झाले. आम्ही २०२४ चा विश्वचषक सामना थाळीमध्ये भारताला दिला आणि आता असे वाटत आहे की, पुंन्हा आम्ही सामना थाळीत त्यांच्या हाती दिला आहे.”
हेही वाचा : IND vs SL : दीप्ती शर्माने रचला इतिहास! महिला विश्वचषकात ‘हा’ भीम पराक्रम करणारी ठरली पहिलीच भारतीय
मोहम्मद आमीर व्हिडीओमध्ये म्हणत आहे की, “आशिया कप स्पर्धेत भारताने नाणेफेक जिंकून आम्हाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी देऊन उत्तम काम केले होते. मला असे वाटते की आम्हाला अंतिम फेरीत प्रथम फलंदाजी करायला हवीच होती. आम्हाला इतकी चांगली सुरुवात मिळाली होती. अंतिम फेरीमध्ये तुम्हाला यापेक्षा चांगली सुरुवात कोणती अधिक मिळू शकते? ११ षटकांमध्ये १०३ धावा आणि फक्त एक बाद. दोन्ही सलामीवीरांनी चांगल्या धावा काढल्या. तुम्ही आणखी काय मागू शकता? मला अजून देखील समजत हे नाही की काय झाले. अल्लाहची शपथ, आता कायच बोलणार माणूस?”
Acc to Muhammad Amir match k 2 main points
1.M haris ka axar ko aati hai marna jab k dosri taraf set batter tha
2.agha ka pacer ko lana jab k wo spinners py phaas rhy thu pic.twitter.com/yhKFSbxl3n — FAKHAR💚AMIR💜 IMAD ❤️ (@hahs4221522_) September 29, 2025
आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये आघाडीवर चांगली सुरुवात केली होती. तरी देखील, त्यांना ट्रॉफी जिंकण्यात अपयश आले. दुबईमध्ये नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानी संघाने पहिल्या १२.५ षटकांत दोन गडी गमावून ११३ धावा केल्या होत्या. तथापि, त्यांच्या विकेट एकामागून एक पडू लागल्यावर, ते १९.१ षटकांत १४६ धावांतच पाकिस्तानी संघ गारद झाला.
हेही वाचा : IND VS PAK : ‘आधी नक्वीसोबत हस्तांदोलन, पण ट्रॉफीस नकार? कर्णधार सूर्या अडचणीत? वाचा सविस्तर…
जेव्हा भारतीय संघ १४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा पाकिस्तानी गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली. त्यांनी भारतीय संघाचे पहिले तीन गडी केवळ चार षटकांत २० धावांत माघारी पाठवले. परंतु त्यानंतर, त्यांनी पुन्हा त्यांची लय गमावली आणि परिणामी पाकिस्तानचा पराभव झाला. भारताने हा सामना ५ विकेट्सने खिशात टाकला आणि विजेतपद जिंकले.