
Kabaddi Mahakumbh to be held in the country! PKL Season-12 schedule announced; Competition starts from 29th August
वेळापत्रक जाहीर करताना आयोजकांकडून सांगण्यात आले की, “ही लीग विशाखापट्टणम येथून सुरू होणार आहे. २९ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान विझागमध्ये सामने खेळवले जातील. या हंगामातील पहिला सामना तेलुगु टायटन्स आणि तमिळ थलैवाज यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना २९ ऑगस्ट रोजी होणार आहे. पहिल्या दिवशी दोन सामने खेळले जाणार असून त्याच वेळी, दुसरा सामना बेंगळुरू बुल्स आणि पुणेरी पलटन यांच्यात खेळला जाईल. हा सामना रात्री ८.३० वाजेपासून खेळवला जाणार आहे. विशाखापट्टणममध्ये एकूण २८ सामने होणार आहेत.”
विशाखापट्टणमनंतर, लीग सामने जयपूरमध्ये खेळवले जाणार असून हे सामने १२ ते २७ सप्टेंबर दरम्यान जयपूरमध्ये खेळवले जाणार आहेत. या काळात एकूण २४ सामने होणार आहेत. जयपूर लीगमधील पहिला सामना जयपूर पिंक पँथर्स आणि बेंगळुरू बुल्स यांच्यात खेळला जाणार आहे. हा प्रो कबड्डीचा २९ वा सामना असणारा आहे. २८ तारखेला तमिळ थलाईवाज आणि बंगाल वॉरियर्स यांच्यात सामना खेळवला जाईल.
जयपूरनंतर, प्रो कबड्डी लीगचा हा प्रवास चेन्नईला सुरु होईल. चेन्नई लीगमध्ये एकूण २८ सामने खेळवण्यात येणार आहेत. चेन्नई लीगचा पहिला सामना २९ सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना यूपी योद्धा आणि गुजरात जायंट्स यांच्यात होणार आहे. हा कबड्डी लीगमधील ५३ वा सामना असणार आहे. या लीगमधील अंतिम सामना बेंगळुरू बुल्स आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यात रंगणार आहे.
हेही वाचा : ZIM vs NZ : मॅट हेन्रीने रचला इतिहास! दोनच किवी गोलंदाजांनी झिम्बाब्वेला पहिल्याच दिवशी गुंडाळलं
या लीगचा शेवटचा टप्पा दिल्लीमध्ये खेळला जाणार आहे. दिल्लीमध्ये २८ सामने खेळवण्यात येणार आहेत. दिल्लीचा टप्पा १३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या टप्पामधील पहिला सामना पटना पायरेट्स आणि हरियाणा स्टीलर्स यांच्यात खेळला जाईल. या टप्पामधील अंतिम सामना २३ ऑक्टोबर रोजी पटना पायरेट्स आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यात खेळला जाईल. त्यानंतर, टॉप-६ संघ बाद फेरीत प्रवेश दाखल होतील. वेळापत्रकनंतर जाहीर करण्यात येईल.