शुभमन गिल(फोटो-सोशल मीडिया)
हेही वाचा : ZIM vs NZ : मॅट हेन्रीने रचला इतिहास! दोनच किवी गोलंदाजांनी झिम्बाब्वेला पहिल्याच दिवशी गुंडाळलं
लंडनमधील ओव्हल येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी शुभमन गिलेने सेना (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत परदेशी कर्णधाराने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडला आहे. पाचव्या कसोटी सामन्यात गॅरी सोबर्सचा ७२२ धावांचा विक्रम मागे टाकण्यासाठी गिलला एका धावेची आवश्यकता होती आणि त्याने त्याच्या डावाच्या सहाव्या चेंडूवर दोन धावा काढत हा टप्पा पार केला.
१९६६ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेदरम्यान गॅरी सोबर्सने वेस्ट इंडिजचा कर्णधार म्हणून पाच सामने खेळले होते. या दरम्यान ७२२ धावा केल्या होत्या. तेव्हापासून हा विक्रम त्याच्या खात्यावर जमा होता. पण, या मालिकेत शुभमन गिलने शानदार फलंदाजीने अनेक विक्रम आपल्या नावावर जमा केले. यामध्ये गॅरी सोबर्सचा विक्रम मोडीत काढण्याचा देखील समावेश आहे.
त्याच वेळी, गिलने ११ धावा काढताच आणखी एक कामगिरी करून दाखवली. त्याने सुनील गावस्कर यांचा कर्णधार म्हणून भारतासाठी कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील मोडला आहे. गिलच्या आता कर्णधार म्हणून ७३३ धावा झाल्या आहेत. १९७८-७९ मध्ये भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेदरम्यान, सुनील गावस्कर यांनी कर्णधार म्हणून सहा सामने खेळले होते. या दरम्यान त्यांनी एकूण ७३२ धावा फटकावल्या होत्या.






