Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women’s ODI World Cup : पॉवर-हिटर आणि फिरकीपटूंचा विश्वचषकात डंका! झेल पकडण्याचा टक्का घसरला, तर DRS नेही केली निराशा…. 

महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिका महिला संघाचा ५२ धावांनी पराभव करून जेतेपद जिंकले. या स्पर्धेत सर्वाधिक धावा काढल्या गेल्या, जय मागील स्पर्धेपेक्षा अधिक आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 04, 2025 | 07:18 PM
Women's ODI World Cup: Power-hitters and spinners are the big guns in the World Cup! Catch percentage drops, DRS also disappoints....

Women's ODI World Cup: Power-hitters and spinners are the big guns in the World Cup! Catch percentage drops, DRS also disappoints....

Follow Us
Close
Follow Us:

Women’s ODI World Cup 2025 : महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चा थरार संपला असून क्रिकेट विश्वाला नवा जगज्जेता मिळाला. 2 नोव्हेंबर रोजी नवी मुंबई येथे खेळल्या गेलेल्या महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिका महिला संघाचा ५२ धावांनी पराभव केला आणि जेतेपद आपल्या नावावर केला. या संपूर्ण स्पर्धेत अनेक घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये फलंदाज कधी गोलंदाजांवर वरचढ ठरले तर कधी गोलंदाजांनी फलंदाज बांधून ठेवले. कधी झेल सुटले तर कधी अप्रतिम झेल देखील टिपण्यात यश आले. तसेच डीआरसने निराशा केली. आता आपण संपूर्ण स्पर्धेतील आकडेवारीमनुसार माहिती घेणार आहोत.

हेही वाचा : Women’s ODI World Cup : भारतात विश्वचषक विजयाचा जल्लोष, पाकिस्तानमध्ये तर PCB ने प्रशिक्षकावर उगारला राग; घेतला मोठा निर्णय

एकदिवसीय विश्वचषकात झाल्या सर्वाधिक धावा..

२०२५ च्या आवृत्तीत महिलांच्या खेळात यापूर्वी कधीही न पाहिलेल्या प्रमाणात फलंदाजांची संख्या वाढली आहे. या स्पर्धेत एकूण ११,२७५ पेक्षा अधिक धावा फटकावल्या गेल्या आहेत. जे मागील आवृत्तीपेक्षा एक ही आकडेवारी मोठी आहे. या स्पर्धेत १५ वैयक्तिक शतके देखील झाली आहेत. जी २०१७ मध्ये १४ शतकांपेक्षा जास्त आहेत. या स्पर्धेत २१ फलंदाजांनी २०० धावा पार केल्या आहेत, त्यापैकी २० जणांनी ७५ पेक्षा जास्त धावा केल्या, ही धावसंख्येच्याबाबत मोठी झेप मानली जात आहे.

रनरेट विरुद्ध इकॉनॉमी रेट

फलंदाजीच्या धावा करणाऱ्या आणि गोलंदाजीच्या इकॉनॉमी रेटमध्ये सर्वोत्तम फरक असलेल्या संघांनाच फक्त उपांत्य फेरीत स्थान मिळवता आले. ऑस्ट्रेलिया +१.१० च्या सर्वोत्तम फरकासह अव्वल राहीला.  त्यानंतर दक्षिण आफ्रिका (०.६३), भारत (०.५२) आणि इंग्लंड (०.०६) यांचा क्रमांक लागतो.

सिक्स-फटकेबाजीची लाट उसळली

मागील दोन विश्वचषकांमध्ये महिला क्रिकेटमधील पॉवर हिटिंगमध्ये थोडी क्रांती झाल्याचे दिसते. तर २०२५ ने ते सिद्ध करून दाखवले. या स्पर्धेत विक्रमी १३३ षटकार लगावण्यात आले. जे २०१७ च्या तुलनेत १११ षटकारांपेक्षा २२ जास्त आहेत. या आवृत्तीत चेंडू-प्रति-बाउंड्री गुणोत्तर (९.८) दहापेक्षा कमी राहिले  होते. पहिल्यांदाच, एका आवृत्तीमध्ये एकूण धावगतीने पाच धावांचा टप्पा  पार केला. ज्याचा ५.१४ वर शेवट झाला.  या विश्वचषकात डावखुरा फिरकी गोलंदाजांपेक्षा इतर कोणत्याही गोलंदाजीचा जास्त प्रभाव दिसून आला नाही. त्यांनी सर्व प्रकारच्या गोलंदाजीमध्ये सर्वात कमी चेंडू-प्रति-विकेट गुणोत्तर दिले – २९.९९, पुढील सर्वोत्तमपेक्षा सुमारे चार चेंडू कमी, जे उजव्या हाताने लेगस्पिन करत होते. एका आवृत्तीत डावखुरा फिरकी गोलंदाजांनी सर्वाधिक बळी टिपले आहेत, ११०, जे १९८२ मध्ये झालेल्या विक्रमापेक्षा ३३ने जास्त होते.

लोअर-ऑर्डरचे शानदार पुनरागमन

या स्पर्धेत टॉप-ऑर्डरचे वर्चस्व जरी दिसूनले असले तरी खालच्या ऑर्डरची लवचिकता देखील दिसून  आली आहे.  २०२५ मध्ये शेवटच्या पाच विकेट्सची सरासरी २०.१ धावा होत्या, जी आकडेवारी ही महिला एकदिवसीय विश्वचषकातील सर्वोत्तम होती आणि प्रति षटक ५.३ धावा काढण्यात आल्या. १९ षटकांत जवळजवळ १०० धावा झाल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.

वोल्वार्ड्ट आणि दीप्तीने राखले वर्चस्व

दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्टने या स्पर्धेत ५७१ धावा केल्या, ज्या महिला एकदिवसीय विश्वचषक आवृत्तीत कोणत्याही फलंदाजाने काढलेल्या सर्वाधिक आहेत आणि विश्वचषक नॉकआउटमध्ये आता विक्रमी ३३६ धावा आहेत. दरम्यान, भारताची अष्टपैलू खेळाडू  दीप्ती शर्मा एका एकदिवसीय स्पर्धेत २०० पेक्षा जास्त धावा आणि २० पेक्षा जास्त विकेट्स घेणारी पहिली महिला ठरली आहे.

झेल पकडण्याची टक्केवारी कमी

स्पर्धेत संपूर्ण संघांना सोडलेले झेल त्रास देत राहिले आहेत. जवळजवळ प्रत्येक तीन संधींपैकी एक संधी गामावण्यात आली. ज्याची झेल कार्यक्षमता ६७.३% होती, जी २०२२ मधील ७२.९% पेक्षा कमी राहिली आहे. इंग्लंड (७६.९%) आणि न्यूझीलंड (७५%) सर्वात तीक्ष्ण क्षेत्ररक्षण केले. तर बांगलादेश (४४.४%), भारत (६३.३%), दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया (दोन्ही ६६.७%) दुसऱ्या टोकावर राहिले.

डीआरएसची निराशाजनक कामगिरी

जर डीआरएस हे खेळात स्पष्टता आणण्यासाठी असेल, तरी  त्यामुळे अनेक संघांची निराशा दिसून आली आहे. सरासरी, संघांनी दर तीन प्रयत्नात एक यशस्वी रिव्ह्यू मिळवण्यात यश आले आहे. चुकीच्या कारणांमुळे भारताने आघाडी घेतली असून १५ पैकी ११ डीआरएस अयशस्वी ठरले. त्यानंतर ऑस्ट्रेलिया (६/१०) पाच रिव्ह्यूमध्ये फक्त बांगलादेशने ८०% यश दर मिळवला आहे, इतर कोणत्याही संघाने ४५% ओलांडलेला नाही.

Web Title: Power hitters and spinners sting drs fail in womens odi world cup 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2025 | 07:18 PM

Topics:  

  • ICC Women Cricket World Cup 2025
  • IND W vs SA W

संबंधित बातम्या

Women’s ODI World Cup : राज्य सरकारकडून स्मृती, जेमिमा आणि राधा यादव यांचा गौरव होणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा 
1

Women’s ODI World Cup : राज्य सरकारकडून स्मृती, जेमिमा आणि राधा यादव यांचा गौरव होणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा 

IND W vs SA W Final Match : ‘१९८३ सारखा बदल घडविण्याची…’ भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक मजुमदार यांचे विधान चर्चेत 
2

IND W vs SA W Final Match : ‘१९८३ सारखा बदल घडविण्याची…’ भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक मजुमदार यांचे विधान चर्चेत 

IND W vs SA W : हिमाचल सरकारकडून होणार रेणुका ठाकूरचा सन्मान! मुख्यमंत्री सुखु यांची मोठी घोषणा; वाचा सविस्तर 
3

IND W vs SA W : हिमाचल सरकारकडून होणार रेणुका ठाकूरचा सन्मान! मुख्यमंत्री सुखु यांची मोठी घोषणा; वाचा सविस्तर 

देशप्रेम…विश्वचषक फायनलच्या सामन्याआधी Amanjot Kaur च्या आजीचे निधन होऊनही खेळाडू देशासाठी लढली
4

देशप्रेम…विश्वचषक फायनलच्या सामन्याआधी Amanjot Kaur च्या आजीचे निधन होऊनही खेळाडू देशासाठी लढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.