पाकिस्तानी मुख्य प्रशिक्षक मोहम्मद वसीम(फोटो-सोशल मीडिया)
Pakistan head coach Mohammad Wasim sacked : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफी जिंकली आहे. त्याच ठिकाणी कामगिरीमुळे पाकिस्तान संघ मात्र २०२५ च्या महिला विश्वचषकातून आधीच बाहेर पडला होता. अशातच आता पाकिस्तानकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. पाकिस्तानने मुख्य प्रशिक्षकावर आपला संताप व्यक्त केला आहे. खरं तर, महिला विश्वचषकातील खराब कामगिरीमुळे, पाकिस्तानी मुख्य प्रशिक्षक मोहम्मद वसीम यांना त्यांच्या पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
हेही वाचा : IPL 2026 : LSG ला मिळाले नवे ग्लोबल डायरेक्टर! दोन वेळा विश्वचषक विजेते टॉम मूडी पाहणार काम
एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की २ नोव्हेंबर रोजी संपलेल्या महिला विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तान संघ एक देखील सामना जिंकू शकला नाही. पाकिस्तान संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. ज्यामुळे संघाला गुणतालिकेत तळाशी राहावे लागले. अहवाल असे देखील सूचित करत आहेत की मोहम्मद वसीमने स्वतः मुख्य प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या बातमीची सत्यता योग्य वेळी उघड होणारच आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक मोहम्मद वसीम यांचा कार्यकाळ संपुष्टात आणला असून वसीमचा करार विश्वचषकासोबत संपला आहे आणि तो वाढण्याची शक्यता नाही. पीसीबी आता नवीन प्रशिक्षकाच्या शोधात आहे आणि यावेळी परदेशी उमेदवाराचा विचार करण्याची योजना आखत असल्याची माहीती आहे.
बोर्ड सूत्रांनुसार, जर परदेशी प्रशिक्षक मिळण्यात अपयश आले तर माजी कर्णधार बिस्माह मारूफ यांना तात्पुरती भूमिका देण्यात येऊ शकते. बिस्माह बराच काळ संघाशी संबंधित राहिला आहे आणि खेळाडूंसोबत काम करण्याचा त्यांचा व्यापक अनुभव देखील आहे.
मागील वर्षी मोहम्मद वसीम यांची पाकिस्तान महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली गेली होती. तथापि, त्यांच्या कार्यकाळात संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. पाकिस्तान आशिया कप उपांत्य फेरीत पराभूत झाला आणि त्यानंतर टी-२० विश्वचषकातील लीग टप्प्यातून त्याला बाहेर पडावे लागले.
हेही वाचा : अमेरिकेच्या मिलिंद कुमारचा विराट कोहलीला धोबीपछाड! एकदिवसीय क्रिकेटमध्ये केला ‘हा’ कारनामा
पाकिस्तान संघचे सर्व विश्वचषक सामने कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात आले होते. यापैकी तीन सामने पावसामुळे रद्द झाले, तर उर्वरित चार सामन्यात संघाला पराभव स्वीकारावा लागला. परिणामी, पाकिस्तान संघाला तीन गुणांसह स्पर्धेत तळाशी राहावे लागले.






