Prithvi Shaw's century proved to be beneficial! IPL franchises lined up with new offers; Results will be seen in the mini auction
IPL franchises queue up for Prithvi Shaw : पृथ्वी शॉ खूपदा चर्चेत येत असतो. पृथ्वी शॉच्या फलंदाजी शैलीने सर्वांना प्रभावित केले होते, आयपीएलसह त्याने भारतीय संघात देखील आपली जागा मिळवली. त्याची तुलना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत देखील होऊ लागली होती. परंतु, त्याला लागलेली वाईट संगत आणि त्यातून त्याची ढासळलेली कामगिरी यामुळे तो क्रिकेटपासून दूर जाऊ लागला होता. परंतु, त्याने आता चांगले पुनरागमन केले आणि बुची बाबू स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळताना शॉने पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात छत्तीसगडविरुद्ध शतक ठोकून सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवल्या. त्याने पहिल्या डावात 15 चौकार आणि एक षटकार मारत 111 धावांची खेळी खेळली. त्यामुळे आयपीएल मेगा लिलावात ज्याला कुणी विकत घेण्यात रस दाखवला नाही, आता मात्र त्याच्या या खेळीने आयपीएल फ्रेंचायझीला आपल्याकडे खेचून घेतल्याकजे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा : मॅथ्यू ब्रीट्झकेने रचला इतिहास! पहिल्या चार ODI मध्ये केला ‘हा’ पराक्रम ; ‘या’ भारतीय दिग्गजाशी साधली बरोबरी
पृथ्वी शॉ इंडियन प्रीमियर लीगच्या १७ व्या हंगामात शेवटचा खेळला होता. त्याने दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना आठ सामन्यात 24.75 च्या सरासरीने 198 धावा केल्या होत्या. या कारणाने दिल्ली फ्रँचायझीकडून त्याला 2025 च्या हंगामापूर्वी रिलीज करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या मेगा लिलावात त्याला कुणी देखील खरेदी केले नव्हते. त्यामुळे त्याच्या पदरी निराशा आली होती. मात्र पृथ्वी शॉचा सध्याची लय बघता कोलकाता नाईट रायडर्स त्याला संघात घेण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जाऊ लागले आहे.
आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली होती. त्यांना 14 पैकी फक्त 5 सामन्यात विजय मिळवता आला होता. त्यामुळे संघात मोठी उलटफेर होणार असल्याचे बोलले जात आहे. केकेआरच्या संघाकडे चांगला सलामीवीर नसल्याने ती जागा भरून काढण्या करता योग्य खेळाडू म्हणून पृथ्वी शॉ हा चांगला पर्यात ठरण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : BCCI मध्ये निघाल्या नवीन जागा! ‘या’ नोकरीसाठी मिळणार वार्षिक तब्बल ९० लाख रुपये
आयीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील दिल्ली कॅपिटल्स संघाला देखील प्लेऑफचे तिकीट मिळू शकले नाही. सुरुवातीला चांगली कामगिरी केली खरी परंतु त्यानंतर संघाला उतरती कळा लागली. या स्पर्धेत दिल्लीकडून सलामीसाठी चार खेळाडूंना संधी देण्यात आली होती. फाफ डु प्लेसिसने 9 डावात 202 धावा केल्या होत्या. जॅक फ्रेझर मॅकगर्कने 6 डावात 55 धावा, तर केएल राहुलने 539 धावा केल्या होत्या. तर अभिषेक पोरेलने 301 धावा फटकावल्या होत्या. त्यामुळे संघाला एक स्थिर सुरवात करून देणाऱ्या फलंदाजाची गरज असल्याचे बोलले जात आहे. ही गरज पृथ्वी शॉ भरून काढू शकतो असे बोलले जात आहे. तीच स्थिति चेन्नई सुपर किंग्स या संगहची देखिल आहे. 18 व्या हंगामात हा संघ 14 पैकी फक्त 4 सामने जिंकू शकला. सीएसकेची टॉप ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरली होती. पृथ्वी शॉ जर चेन्नईचा भाग बनला तर संघ मजबूत स्थितीत येण्याची शक्यता आहे.