मॅथ्यू ब्रीट्झके(फोटो-सोशल मीडिया)
Matthew Britzke creates history in ODI cricket : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज मॅथ्यू ब्रीट्झकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८८ धावांची खेळी करून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सलग चौथे अर्धशतक झळकावून इतिहास रचला आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात मॅथ्यू ब्रीट्झक हा त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या ४ डावात सलग चार वेळा ५०+ धावा करणारा पहिला फलंदाज बनला आहे.
हेही वाचा : BCCI मध्ये निघाल्या नवीन जागा! ‘या’ नोकरीसाठी मिळणार वार्षिक तब्बल ९० लाख रुपये
मॅथ्यू ब्रीट्झकेने गुरुवारी मॅके येथे खेळवण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हा भीम पराक्रम केला आहे. त्याने ८८ धावांची खेळी खेळून इतिहास रचला. या खेळीत त्याने ८ चौकार आणि २ षटकार लगावले. तथापि, तो ३१ व्या षटकात माघारी परतला. ब्रीट्झकेने त्याच्या पहिल्या कारकीर्दीतील चार एकदिवसीय सामन्यात चार वेळा ५० पेक्षा जास्त धावा करून नवज्योत सिंग सिद्धूच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.
नवजोत सिंग सिद्धूने १९८७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले होते. नवजोत सिंग सिद्धूने त्याच्या चार एकदिवसीय सामन्यांमध्ये सलग चार अर्धशतकं झळकवले होते. यामध्ये नवजोत सिंग सिद्धूने ७३ (ऑस्ट्रेलियाविरुद्ध), ७५ (न्यूझीलंडविरुद्ध), ५१ (ऑस्ट्रेलियाविरुद्ध) आणि ५५ (झिम्बाब्वेविरुद्ध) धावा केल्या होत्या.
ब्रिट्झकेने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीची दमदार सुरुवात केली. त्याने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातच शतक झळकावले ठोकले. त्यानंतर पुढील तीन डावांमध्ये देखील ५० पेक्षा अधिक धावांची खेळी केली. या वर्षाच्या सुरुवातीला ब्रिट्झकेने लाहोरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या सामन्यात त्याने १५० धावांची शानदार खेळी खेळली होती. जी एकदिवसीय सामन्यातील पदार्पणातील आतापर्यंतची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या मॅथ्यू ब्रीट्झकेने आता पहिल्या चार एकदिवसीय डावांनंतर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील आपल्या नावावर केला आहे. त्याने ३७८ धावा करून टेम्बा बावुमाचा २८० धावांचा विक्रमाला मागे टाकले.
हेही वाचा : दक्षिण आफ्रिकेतील ‘या’ 8 शहरांमध्ये रंगणार 44 सामन्यांचा थरार! World Cup 2027 बद्दल मोठी माहिती समोर..






