Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रो लीग कबड्डी 11व्या पर्वात महाराष्ट्राचा डंका, ‘या’ मराठमोळ्या खेळाडूची कर्णधारपदी नियुक्ती

प्रो लीग कबड्डी 11व्या पर्वाला येत्या 18 तारखेपासून सुरुवात होणार आहे. य़ामुळे कबड्डीप्रेमींवर उत्साहाच वातावरण पाहायला मिळत आहे. यंदाचं हे पर्व महारष्ट्रसाठी अभिमानास्पद ठरत आहे. प्रो लीग कबड्डीतच्या संघातील कर्णधार म्हणून मराठमोळ्य़ा खेळाडूची निवड करण्यात आली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 15, 2024 | 12:29 PM
प्रो लीग कबड्डी 11व्या पर्वात महाराष्ट्राचा डंका, 'या' मराठमोळ्या खेळाडूची कर्णधारपदी नियुक्ती

प्रो लीग कबड्डी 11व्या पर्वात महाराष्ट्राचा डंका, 'या' मराठमोळ्या खेळाडूची कर्णधारपदी नियुक्ती

Follow Us
Close
Follow Us:

चिपळूण (संतोष सावर्डेकर):- प्रो लीग कबड्डी 11व्या पर्वाला 18 तारखेपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे कबड्डी प्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. यंदाचं प्रो लीग कबड्डी 11 चं पर्व महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. याचं कारण म्हणजे या स्पर्धेतील पाटणा पायरेट्स संघाच्या कर्णधारपदी कोकणातल्या खेळाडूची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील कबड्डी प्रेमींमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी येथील शुभम शिंदे यांची पायरेट्स संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. या निवडीने शुभम शिंदे यांच्यावर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.चिपळूण शहरासह ग्रामीण भागात कबड्डी खेळाला फार मोठे महत्त्व आहे. राजकीय पक्षांसह सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने स्पर्धा आयोजित केल्या जातात. यातून नवोदित खेळाडू तयार होत असल्याचे वेळोवेळी स्पष्ट होत झाले. विशेष म्हणजे प्रो प्रीमियर लीग कबड्डी स्पर्धेमध्ये या खेळाडूंना आपला खेळ दाखविण्याची संधी मिळाली आहे. आता तर प्रो कबड्डी 11व्या पर्वाच्या स्पर्धेत चिपळूण-कोळकेवाडी येथील शुभम शिंदे यांची पटणा पायरेट्स संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.

हेही वाचा-धावांचा पाऊस केल्यावर संजू सॅमसनला शशी थरूर यांनी केलं सन्मानित! 

चिपळूणच्या शुभम शिंदे यांची पटणा पायरेट्स संघाच्या कर्णधारपदी निवड

शुभमने सन २०१७ पासून जुनिअर नॅशनल खेळायला सुरुवात केली. त्यानंतर सलग तीन वर्ष नॅशनल स्पर्धेत आपल्या खेळाची चुणूक दाखवली. यामुळेच सिनियर नॅशनल स्पर्धेत सन २०२०, २०२२, २०२४ मध्ये खेळून कबड्डी स्पर्धेत आपले अस्तित्व सिद्ध केले. तत्पूर्वी स्थानिक संघ वाघजाई, कोळकेवाडी संघाकडून खेळतांना कबड्डी खेळाला सुरुवात केली. स्थानिक स्पर्धांमध्ये देखील शुभमनी क्रीडा रसिकांची वाहवा मिळवल्याचे वेळी पहावयास मिळाले आहे.

हेही वाचा- IND vs NZ : आर अश्विन विक्रम मोडण्याच्या इराद्यात, टीम इंडिया करणार का न्यूझीलंडचा पराभव?

कोण आहे शुभम आहे शुभम शिंदे ? 

खेळाव्यतिरिक्त शुभम सध्या सेंट्रल रेल्वे मध्ये तिकीट तपासणीस म्हणून कार्यरत आहे. या आधी शुभमचे दोन वेळा इंडियन कॅम्पमध्ये सिलेक्शन झाले. प्रो कबड्डी मध्ये त्याने पुणेरी पलटण संघातून खेळायला सुरुवात केली व दोन वर्ष त्याचं संघाकडून खेळला. त्यानंतर पटणा पायरेट्स आणि बंगाल वॉरियर्स संघाकडून नंतर 2 वर्ष खेळला. मात्र आता पटणा पायरेट्स संघाकडून खेळतांना शुभम शिंदे यांची कर्णधार म्हणून निवड झाली आहे.

यावर शुभम शिंदेच्या वडिलांनी आनंद व्यक्त केला आहे. शुभमला लहानपणासूनच कबड्डी खेळाची आवड आहे. तसंच शुभमचा भाऊ आदित्यला देखील ल कबड्डीची आवड असल्याने या दोघांनाही आम्ही आई-वडिलांनी प्रोत्साहन दिलं,असं शुभमच्या वडीलांनी सांगितलं. आदित्यने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे कर्णधार पद भूषवताना ६७ वर्षानंतर प्रथमच अजिंक्यपद मिळवून दिले होते. शुभम व आदित्य मागील वर्षी प्रो कबड्डी मध्ये एकाच संघाकडून बंगाल वारियर्स खेळण्याची संधी मिळाली. प्रो कबड्डी मध्ये दोघे सख्खे भाऊ एका संघातून खेळताना पहायला मिळालं होतं तेव्हा पालक म्हणून आम्हाला दोन्ही मुलांचा अभिमान आहे. असं शुभम शिंदेच्या वडीलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

 

Web Title: Pro league kabaddi 11th season shubham shinde maharashytas player appointed as captain of patna pirates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2024 | 12:27 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.