फोटो सौजन्य - सोशल मीडिया
आर अश्विन : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये १६ ऑक्टोबरपासून कसोटी मालिका सुरुवात होणार आहे. भारत न्यूझीलंड यांच्यात टीम सामान्यांची कसोटी मालिका आयोजित करण्यात येणार आहे. न्यूझीलंडचा भारत दौरा असणार आहे, भारताचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ही मालिका खेळणार आहे. भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दृष्टीने महत्वाची असणार आहे. रँकिंग वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारताचा संघ अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर भारतामध्ये टीम इंडियाला पराभूत करणं संघासाठी एक आव्हान असणार आहे. आता भारताचा संघ न्यूझीलंडविरुद्ध कशाप्रकारे कामगिरी करेल यावर क्रिकेट प्रेमींची नजर असणार आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामधील पहिली कसोटी बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवली जाणार आहे, ज्यामध्ये आर अश्विनला इतिहास रचण्याची संधी आहे. अनुभवी ऑफस्पिनर अश्विनला ३ विकेट्सची गरज आहे आणि जर त्याने पहिल्या कसोटीत तीन विकेट घेतल्या तर तो WTC इतिहासात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरेल. सध्या आर अश्विनच्या नावावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये १८५ विकेट्स आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्यांना तीन विकेट्सची गरज आहे. त्याने तीन विकेट घेतल्यास त्याच्या विकेट्सची संख्या १८८ होईल. अशाप्रकारे तो नॅथन लायनला मागे टाकेल आणि WTC इतिहासातील सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनेल.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिला सामना १६-२० ऑक्टोबर या दरम्यान खेळवली जाणार आहे. या सामन्याचे आयोजन एम चिन्नास्वामी स्टेडियमवर करण्यात आले आहे. त्यानंतर या दोन्ही संघामधील दुसरा महामुकाबला २४-२८ ऑक्टोबर यादरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. त्यानंतर मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, आकाश. , जसप्रीत बुमराह (उपकर्णधार).