PSL 2025: First carelessness, then shouting, PSL match turned into a brawl in a moment; VIDEO VIRAL
PSL 2025 : भारतात आयपीएल २०२५ चा थरार सुरू असून पाकिस्तानमध्ये देखील सुपर लीग स्पर्धा सुरू आहे. पीएसएल सुरू झाल्यापासून, काही ना काही कारणाने चर्चेत येत असते. यावेळी देखील PSL चर्चेत आली आहे. यावेळी कारण चकिंग आहे. पाकिस्तान सुपर लीगचा १३ वा सामना मुल्तान सुल्तान आणि इस्लामाबाद युनायटेड यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात इस्लामाबादचा फलंदाज कॉलिन मुनरोने मुल्तान सुल्तानचा गोलंदाज इफ्तिखार अहमदवर चकिंगचा आरोप केला. त्यानंतर हे प्रकरण वाढतच गेले आणि आरडाओरड सुरू झाली. नेमकं काय घडलं जाणून घेऊया.
सामन्याच्या १० व्या षटकात इफ्तिखार अहमद मुल्तान सुल्तानकडून गोलंदाजी करण्यासाठी आला, त्यावेळी स्ट्राईकवर कॉलिन मुनरो होता. इफ्तिखार अहमदने यॉर्कर बॉल टाकला, त्यानंतर मुनरोने लगेचच संकेत दिला की तो पूर्णपणे हात हलवताना दिसत नाही. तो चकिंग करत आहे. मुनरोच्या तक्रारीनंतर इफ्तिखार पूर्णपणे संतापलेला दिसला आणि त्याने मुनरोशी वाद घालायला सुरवात केली. या दरम्यान, त्याच्या संघातील सर्व खेळाडू पुढे आले आणि त्याच्याशी वाद घालायला सुरवात झाली.
इफ्तिखार संताप व्यक्त व्यक्त करत पंचांकडे गेला आणि काहीतरी सांगू लागला. यानंतर मुलतान सुलतानचा कर्णधार मोहम्मद रिझवानचा राग अनावर झाला आणि तो फलंदाजाशी भांडू लागला. गोलंदाज आणि कर्णधाराकडून फलंदाजाला घेरण्यात आले. त्यानंतर त्याच्याशी वाद घालू लागला. यानंतर पंचांकडून कसे तरी प्रकरण शांत करण्यात आले. या दरम्यान सामना बराच वेळ खोळंबला होता. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे.
iftikhar vs munro 😳 pic.twitter.com/kYqHo0R4OU
— IF7 (@IF7____) April 23, 2025
कॉलिन मुनरोच्या तक्रारीनंतर, सामनाधिकारींनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याची माहिती मिळत आहे. अशा परिस्थितीत, पाकिस्तान आपल्या खेळाडूच्या बचावासाठी हे करत असण्याची शक्यता आहे, जेणेकरून त्याला बंदी घालण्यात येऊ नये. असे बोलले जात आहे. कारण, अद्यापही पंचांकडून कोणताही निर्णय आलेला नाही.
सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास, प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुल्तान सुलतानने २० षटकांत ५ गडी गमावून १६८ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात इस्लामाबाद युनायटेडने १७.१ षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य पूर्ण केले. इस्लामाबाद युनायटेड संघाने हा सामना ७ विकेट्सने आपल्या खिशात टाकला.