MI vs SRH : Ishan Kishan चा प्रामाणिकपणा SRH च्या अंगलट!(फोटो-सोशल मीडिया)
MI vs SRH : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील ४१ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत पराभव केला. सामान्यापूर्वी मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद २० षटकांत १४३ धावा केल्या. प्रतिउत्तरात मुंबईने हे लक्ष्य मुंबई इंडियन्सने १६ व्या षटकात पूर्ण केले. या विजयासह मुंबईने आयपीएलमधील सलग चौथ्या विजयाची नोंद केली. तर हैदराबाद मात्र परभवाच्या खाईत रूतला आहे. या सामन्यात एक असा प्रकार घडला ज्यामुळे हैद्राबदला मोठा फटका बसला. इशान किशनची विकेट खरच होती की नव्हती हा मुद्दा देखील उपस्थित झाला आहे.
मुंबईच्या गोलंदाजांनी सामन्यात शानदार कामगिरी केली आणि हैदराबादला १४३ धावांवरच रोखले. काल झालेल्या सामन्यात, हेनरिक क्लासेन आणि अभिनव मनोहर वगळता, हैदराबादचे सर्व फलंदाज अपयशी ठरले. ट्रॅव्हिस हेड शून्य धावांवर बाद झाला. त्यानंतर, इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. मात्र इशानकडून एक अशी चूक झाली, ज्यामुळे हैदराबादला मोठे नुकसान सहन करावे लागले.
हेही वाचा : IPL 2025 : ‘किंग’ कोहलीचा जलवा कायम! खुणावतोय IPL मधील ‘विराट’ पराक्रम; मोडणार ‘हा’ विक्रम..
या सामन्यात इशान किशन ज्या प्रकारे बाद झाला, तो आश्चर्यकारक असाच होता, कारण पंचांनी त्याला बाद देण्यापूर्वीच तो स्वतःहून तंबूत परतला. यानंतर, खरी गोष्ट बाहेर आली तेव्हा इशान किशनसह संपूर्ण स्टेडियम देखील स्तब्ध झालेले दिसून आले.
तिसऱ्या षटकात दीपक चहर मुंबई इंडियन्सकडून गोलंदाजी करण्यासाठी आला. तेव्हा इशान किशन स्ट्राईकवर होता. या षटकातील पहिला चेंडू स्टंप लेग स्टंपच्या बाहेर होता. इशान किशनने हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न देखील केला. दुसरीकडे, अंपायरने तो वाईड बॉल असल्याचे घोषित केले, परंतु नंतर अंपायर देखील थोडा गोंधळलेला असल्याचे दिसून आले.
यानंतर, अंपायरने बोट वर केले आणि नंतर तो थांबला. पण त्यानंतर त्याने पुन्हा बोट वर करून इशान किशनला आउट दिले. हे पाहून कर्णधार हार्दिक पंड्या आणि गोलंदाज दीपक चहरसह सर्व खेळाडू अवाक झाले. यामागील कारण असे की, अंपायरने इशान किशनला आउट देणे हे होते. वास्तवात याचे कारण स्वतः इशान किशन देखील होते.
हेही वाचा : MI vs SRH : ‘हिटमॅन’ एक्सप्रेस सुसाट! SRH विरुद्ध Rohit Sharmaचे अर्धशतक अन् रचला इतिहास, वाचा सविस्तर..
अंपायर दीपक चहरने टकलेला चेंडू वाईड घोषित करू इच्छित होता. परंतु, तो गोंधळात दिसून आला. ज्यावर मुंबईच्या खेळाडूकडूनही आक्षेप घेण्यात आला नाही. पण इशान किशन स्वतः क्रीज सोडून पॅव्हेलियनकडे निघाला होता. मग पंचांना खात्री झाली की इशान किशन खरोखरच बाद झाला आहे. जेव्हा इशान किशन पॅव्हेलियनमध्ये पोहोचला, त्यानंतर रिप्लेद्वारे सत्य समोर आले. नंतर कळले की इशान किशन बाद नव्हता. चेंडू त्याच्या बॅटला लागलाच नव्हता. इशानची ही चूक हैद्राबादसाठी नुकसानकारक ठरली. त्यांना या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.