फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Lucknow Super Giants vs Punjab Kings Match Report : लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये नुकताच सामना पार पडला या सामन्यामध्ये पंजाबच्या संघाने सलग दुसरा विजय आयपीएल २०२५ मध्ये नोंदवला आहे. तर लखनऊचा हा या सिझनचा दुसरा पराभव होता. पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सला ८ विकेट्सने पराभूत केले आहे. हा सामना लखनऊमधील एकेना स्टेडियमवर ठेवण्यात आला होता. सामन्याबद्दल बोलायचं झालं तर पहिले फलंदाजी करून १७२ धावांचे लक्ष्य उभे केले होते हे लक्ष्य पंजाब किंग्सच्या संघाने २२ चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले.
पंजाब किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यामधील सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी समाजाची कामगिरी करून दाखवली. लखनऊ सुपर जायंट्सच्या हाती पहिला विकेट लवकर लागला होता पण प्रभासिमरन सिंह याने सामना एकतर्फी नेला आणि त्याने संघासाठी ३४ मध्ये ६९ धावांची खेळी खेळली. यामध्ये त्याने तीन षटकार आणि नऊ चौकार ठोकले.
पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने संघासाठी आणखी एकदा कमालीची फलंदाजी करून दाखवली यामध्ये त्याने ३० चेंडूंमध्ये ५२ धावा केल्या तर नेहल वढेरा याने संघासाठी २५ चेंडूंमध्ये ४३ धावा केल्या आणि नाबाद राहिला.