पंजाब किंग्स विरूध्द लखनऊ सुपर जायंट्स पहिल्या डावाचा अहवाल : हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाळा येथे सामना सुरु आहे. हा सामना पंजाब किंग्स विरूध्द लखनऊ सुपर जायंट्स यांच्यामध्ये सुरु आहे. या सामन्यात लखनऊच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय रिषभ पंतला महागात पडला असे दिसुन आले आहे. आजच्या सामन्यात पंजाब किंग्सने पहिले फलंदाजी करत लखनौ सुपर जायंट्ससमोर 237 धावांचे लक्ष्य उभे केले आहे. या सामन्यात प्रभसिमरन सिंह याने आणखी एकदा कमालीचा खेळ दाखवला आणि क्रिकेट चाहत्यांचे लक्ष्य वेेधले आहे. श्रेयस अय्यरने देखील चाहत्यांना प्रभावित केले आहे.
आजच्या सामन्याच्या पहिल्या डावात खेळाडुंनी कशी कामगिरी केली यावर एकदा नजर टाका. पंजाब किंग्सच्या फलंदाजीसंदर्भात सांंगायचे झाले तर प्रियांश आर्याने आज त्याची विकेट लवकर गमावली. त्याने 4 चेंडू खेळले आणि बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी आज जोस इंग्लिश फलंदाजीला आला आणि सर्वानाच धक्का बसला होता. आज इंग्लिशने संघासाठी १४ चेंडूंमध्ये ३० धावा केल्या. तर आज चौथ्या विकेटसाठी श्रेयस अय्यर फलंदाजीला आला आणि त्याने आज संघासाठी महत्वाच्या धावा केल्या. श्रेयस अय्यरने आजच्या सामन्यात २५ चेंडूंमध्ये ४५ धावा केल्या. २ षटकार आणि ४ चौकार मारले.
Innings Break!
A mountainous batting effort by #PBKS ❤️ #LSG‘s chase underway 🔜
Scorecard ▶ https://t.co/YuAePC273s#TATAIPL | #PBKSvLSG pic.twitter.com/gMM8nAUx6V
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2025
प्रभसिमरन सिंह याने आजच्या सामन्यात चाहत्याचे लक्ष्य वेधले आहे. या सामन्यात प्रभसिमरन सिंहने लखनऊविरूध्द 91 धावांची खेळी खेळली. यात त्याने 7 षटकार आणि 6 चौकार मारले. त्याच्या या खेळीच्या जोरावर संघाने 237 धावा केल्या आहेत. आयपीएल 2025 मध्ये त्याने आतापर्यत 437 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 4 अर्धशतकांचा समावेश आहे.
श्रेयस अय्यरचा विकेट गेल्यानंतर निहाल वढेरा फलंदाजीला आला होता. त्याने 9 चेंडूमध्ये 16 धावा केल्या. तर शशांक सिंगच्या बॅटने सुध्दा शेवटच्या काही चेंडूवर धावा आल्या त्याने आजच्या सामन्यात 15 चेंडूमध्ये 33 धावा केल्या. यामध्ये त्याने 1 षटकार आणि 4 चौकार मारले. मार्कस स्टॉइनिसने संघासाठी 5 चेंडूमध्ये 15 धावा केल्या.
लखनऊ सुपर जायंट्सच्या गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर पदापर्ण करणारा आकाश सिंह याने संघासाठी त्याच्या पहिल्याच सामन्यात 2 विकेट्स घेतले. तर दिग्वेश राठी यांनी देखील संघासाठी 2 विकेट घेतले. प्रिन्स यादव याने देखील संघासाठी 1 विकेट घेतला.