
PV Sindhu : पीव्ही सिंधूचा मोठा खुलासा! 'आता मी तरुण राहिले नाही'; वर्ल्ड टूर फायनलसाठी घेतला ब्रेक
भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू (PV Sindhu) हिने बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनलसाठी पात्रता मिळवली आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेच्या तयारीसाठीच तिने काही स्पर्धांमधून माघार घेत विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. ‘मी आता तरुण राहिले नाही,’ असे मिश्किल विधान करत सिंधूने आपल्या फिटनेसचे महत्त्व अधोरेखित केले.
जपान ओपन सुपर 750 आणि जर्मनीतील हायलो ओपन स्पर्धेत विजेतेपद मिळवल्यानंतर सिंधूचा आत्मविश्वास उंचावला आहे. 2022 नंतर प्रथमच तिने एका हंगामात बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरची अनेक विजेतेपदे पटकावली आहेत. याशिवाय सारब्रुकेन येथे झालेल्या स्पर्धेपूर्वी तिने फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीतही धडक मारली होती. मात्र, अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू आणि पॅरिस ऑलिम्पिक विजेती दक्षिण कोरियाच्या आन से-यंग हिच्याकडून तिला पराभव स्वीकारावा लागला.
हायलो ओपनमधील विजयानंतर सिंधूने कोरिया ओपन आणि जपान मास्टर्स या स्पर्धांमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला सर्व स्पर्धा खेळण्याचे नियोजन होते. मात्र, सलग स्पर्धांमुळे शरीराला विश्रांती देणे आणि आगामी वर्ल्ड टूर फायनलसाठी पूर्णपणे तंदुरुस्त राहणे आवश्यक असल्याचे तिच्या लक्षात आले.
भारतीय बॅडमिंटन महासंघाने आयोजित केलेल्या माध्यमांशी संवाद साधताना सिंधू म्हणाली की, दीर्घकाळ स्पर्धात्मक दौरा केल्यानंतर कोरिया ओपन आणि त्यानंतरच्या स्पर्धा खेळणे शक्य होणार नाही, असे मला वाटले. माझ्यासाठी मायदेशी परतून विश्रांती घेणेही महत्त्वाचे होते. शरीराची काळजी घेऊन पुढील स्पर्धेसाठी तंदुरुस्त होणे गरजेचे होते. त्यामुळे स्पर्धांमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला.
IND Vs NZ: जिथे संकट तिथे Virat भाऊ तत्पर! स्लिपमध्ये घेतलेल्या भन्नाट झेलचा VIDEO व्हायरल
ती पुढे म्हणाली, मी आता तरुण राहिले नाही. पण 31 हे नवे 21 आहे, असेही मी म्हटले आहे. त्यामुळे मला माझ्या शरीराची काळजी घ्यावी लागेल.
दरम्यान, बॅडमिंटनमध्ये 4 जानेवारी 2027 पासून नवी 3 बाय 15 गुणपद्धती लागू होणार आहे. या बदलामुळे खेळाच्या स्वरूपात काय फरक पडेल आणि आपला खेळ या पद्धतीशी कितपत जुळवून घेईल, याबाबतही सिंधूने भाष्य केले. नव्या गुणपद्धतीत सुरुवातीपासूनच सावध आणि सतर्क राहणे आवश्यक असल्याचे तिने सांगितले.
15 गुणांची पद्धत लक्षात घेऊन प्रत्येक खेळाडूने सराव करणे गरजेचे आहे. आपण अनेक वर्षे 21 गुणांच्या पद्धतीने खेळत आलो आहोत. त्यामुळे नव्या पद्धतीसाठीही आम्ही प्रशिक्षण आणि सराव केला आहे. प्रत्येक खेळाडूसाठी हा बदल वेगळा असेल. सुरुवातीपासूनच सतर्क राहणे महत्त्वाचे आहे. अर्धा गेम संपेपर्यंत सहज गुण गमावता कामा नयेत. प्रत्येक क्षणी सावध राहावे लागेल, असे सिंधूने स्पष्ट केले.
Ans: सिंधूने बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनलसाठी पात्रता मिळवली आहे.
Ans: शरीराला विश्रांती देण्यासाठी आणि आगामी वर्ल्ड टूर फायनलसाठी पूर्णपणे तंदुरुस्त राहण्यासाठी तिने या स्पर्धांमधून माघार घेतली.
Ans: नव्या पद्धतीत सुरुवातीपासून सतर्क राहणे आणि सहज गुण न गमावणे महत्त्वाचे असल्याचे सिंधूने सांगितले.