No one paid in ILT20! Now R Ashwin has taken the big step; will play the entire season for Sydney Thunder in BBL
Ashwin signs contract for entire BBL season : भारतीय संघाचा माजी दिग्गज अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन सद्या चांगलाच चर्चेत आला आहे. त्याने काही दिवसांपूर्वी आयपीएलमधून निवृत्ती घेतली आणि आंतरराष्ट्रीय लीगमध्ये खेळण्यासाठी तो सज्ज झाला. परंतु, त्याला आंतरराष्ट्रीय लीग T20 मध्ये कोणताही खरेदीदार मिळू शकला नाही. लिलावादरम्यान, सहा संघांच्या फ्रँचायझींपैकी कोणीही त्याच्यावर बोली लावली नाही. ILT20 मध्ये विक्री न झाल्यानंतर, अश्विनने आता मोठा निर्णय घेतला आहे.
आंतरराष्ट्रीय लीग T20 मध्ये कुणी खरेदीदार न मिळाल्यावर अश्विनने बिग बॅश लीगचा संपूर्ण हंगाम खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आर. अश्विनने सिडनी थंडरसाठी संपूर्ण बीबीएल हंगाम खेळण्यास सहमती दर्शविली आहे. आर. अश्विनकडून ILT20 लिलावापूर्वी BBL च्या सिडनी थंडरसोबत करार करण्यात आला होता.
बीबीएलमध्ये संपूर्ण हंगाम खेळण्यास सहमती
रवीचंद्रन अश्विनला ILT20 मध्ये देखील खेळायचे होते. त्यामुळे, सुरुवातीला तो संपूर्ण हंगामासाठी सिडनी थंडरकडून खेळण्यास तयार होत नव्हता, परंतु ILT20 मध्ये विक्री न झाल्यानंतर, तो संपूर्ण हंगामासाठी बीबीएलमध्ये सिडनी थंडरकडून खेळण्यास तयार झाला असून अश्विन हा बीबीएलमध्ये खेळणारा पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू ठरला आहे.
अश्विनने याबाबत बोलताना म्हटले की, “मी ILT20 शी तोंडी सहमती दर्शविली होती, परंतु त्यावेळी फ्रँचायझींकडून ऑफर खूपच कमी होत्या कारण सर्व संघांचे थेट करार बंद झाले होते. यादरम्यान, थंडरकडून चांगला करार करण्यात आला आहे. मी ILT20 शी तोंडी सहमती दर्शविली होती, म्हणून मी लिलावात प्रवेश केल्यावर म्हटले की, ‘ही किमान किंमत आहे ज्यावर मी खेळू इच्छितो, अन्यथा मला BBL मध्ये जायला आनंद होणार आहे. ‘”
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ टॉड ग्रीनबर्ग यांनी प्रतिक्रिया दिली की, “रवीचे येथे स्वागत करणे हा बीबीएलसाठी एक मोठा क्षण आहे. मी त्याच्याशी अनेक वेळा वैयक्तिकरित्या बोललो असून मला वाटते की आमच्या चाहत्यांना तो बिबीएलसाठी येथे असेल तेव्हा त्याला खेळताना आणि त्याच्याशी संवाद साधताना पाहण्याचा खूप आनंद होणार आहे.” होबार्ट हरिकेन्स, सिडनी सिक्सर्स आणि अॅडलेड स्ट्रायकर्स यांच्याकडून देखील आपल्या संघात अश्विनला घेण्यास रस दाखवण्यात आला होता.
हेही वाचा : झिम्बाब्वे टी-२० विश्वचषकासाठी पात्र! केनियाच्या पदरी निराशा;आतापर्यंत ‘हे’ १७ संघ ठरले पात्र
रविचंद्रन अश्विनची क्रिकेट कारकीर्द
आर अश्विनने आतापर्यंत एकूण ३३३ टी-२० सामने खेळले असून या काळात त्याने ३१७ विकेट्स चटकावल्या आहेत. त्याने फलंदाजीत देखील आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले असून या सामन्यांमध्ये १२३३ धावा फटकावल्या आहेत.