India's 'The Wall'! Rahul Dravid was afraid to play against 'this' bowler; R Ashwin made a big confession in front of him..
राहुल द्रविड : भारतीय माजी दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविडचे नाव आज देखील क्रीडा जगतात आदराने घेतले जाते. राहुल द्रविडच्या फलंदाजीची दहशत विरोधी गोलंदाजांना असे. त्याला बाद करणे मोठे आव्हान असायचे म्हणूनच त्याला भारताची ‘द वॉल’ म्हटले जायचे. त्याला आता देखील त्याच नावाने ओळखले जाते. पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या अनेक दिग्गज गोलंदाजांनी राहुल द्रविडविरुद्धच्या दबावाबद्दल अनेकदा उल्लेख केला आहे. आता अशातच राहुल द्रविडने एक मोठा खुलासा केला आहे. त्याने अशा गोलंदाजाबद्दल सांगितले की ज्याच्याविरुद्ध खेळणे एक आव्हान असायचे.
गेल्या शुक्रवारी, भारताचा माजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर राहुल द्रविडची मुलाखत पोस्ट केली आहे. या दरम्यान, त्याने क्रिकेटच्या अनेक मुद्द्यांवर मनमोकळे पणाने खुलासे केले आहेत. या दरम्यान, आर. अश्विनकडून त्याच्या यूट्यूब चॅनल ‘कुट्टी स्टोरी विथ अॅश’ मध्ये राहुल द्रविडला विचरण्यात आले की, त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत तो कोणत्या गोलंदाजाला सर्वात जास्त घाबरत होता. याला उत्तर देताना राहुल द्रविडने माजी दिग्गज ऑस्ट्रेलियन गोलंदाज ग्लेन मॅकग्राच्या नावाचा उल्लेख केला आहे.
टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड अश्विनशी बोलताना म्हणाला की, “जर मी वेगवान गोलंदाजांबद्दल सांगायचे झाले तर तो ग्लेन मॅकग्रा आहे. याशिवाय, मी त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या काळात वसीम आणि वकार (पाकिस्तानचा माजी गोलंदाज) यांच्याविरुद्ध खेळलो आहे. त्यामुळे ते योग्य ठरणार नाही. ज्यांनी पूर्वी वसीमविरुद्ध खेळले आहेत, ते म्हणतात की तो वेगळ्या प्रकारचा होता आणि मी व्हिडिओ पाहून याची कल्पना देखील करू शकतो. त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या काळात गोलंदाजी करतानाही तो खूप चांगला दिसून येत होता.”
पुढे, राहुल द्रविड पुढे म्हणाला की, “मी ग्लेन मॅकग्राला त्याच्या शिखरावर असताना खेळलो आहे. तो एक जबरदस्त गोलंदाज असून त्याने इतर कोणत्याही गोलंदाजांपेक्षा माझ्या स्टंपला जास्त आव्हान दिलेअ आहे. मी त्याच्यापेक्षा वेगवान गोलंदाजी करणाऱ्यांनाही खेळलो आहे, परंतु सातत्य आणि कौशल्याच्या बाबतीत, तो मी सामना केलेला सर्वात कठीण गोलंदाज होता.”असे राहुल म्हणाला.
हेही वाचा : RCB संघाने Mohammad Siraj ला का दाखवला होता बाहेरचा रस्ता? कारण आलं समोर, वाचा सविस्तर..
राहुल द्रविड हा भारताच्या सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. त्याने टीम इंडियासाठी एकूण १६४ कसोटी सामने खेळले आहेत, तर ३४४ एकदिवसीय आणि १ टी-२० सामना खेळला आहे. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत राहुल द्रविडने अनेक धोकादायक असणाऱ्या गोलंदाजांचा सामना केला आहे. यामध्ये शोएब अख्तर, वकार युनूस, वसीम अक्रम, शेन वॉर्न, ग्लेन गॅलग्रेव्ह, मुथय्या मुरलीधरन, चामिंडा वास, कोर्टनी वॉल्श, कोर्टनी अँबोस यांसारख्या गोलंदाजांचा त्याने सामना केला आहे.