लिओनेल मेस्सी(फोटो-सोशल मीडिया)
Lionel Messi to tour India : भारतातील फुटबॉल प्रेमींसाठी आंदनाची बातमी समोर आली आहे. लवकरच त्यांचा सर्वात मोठा फुटबॉल स्टार पाहायला मिळणार आहे. भारत देशात क्रिकेटचे जास्त चाहते बघ्याला मिळतात त्या देशात आता फुटबॉलचे वेड देखील अनुभवायला मिळणार आहे. सध्या जगातील सर्वात मोठा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिना फुटबॉल संघ मैत्रीपूर्ण सामना खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या सामन्यासाठीचे वेळापत्रक देखील निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे.
लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिना संघ या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात मैत्रीपूर्ण सामना खेळण्यासाठी भारतात केरळला येणार आहे. अशी माहिती राज्याचे क्रीडा मंत्री व्ही. अब्दुरहिमान यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे दिली. त्यांनी सांगितले की अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशन (एएफए) ने त्यांच्या अधिकृत मेलद्वारे अर्जेंटिना संघ मैत्रीपूर्ण सामना खेळण्यासाठी येत असल्याचे कळवण्यात आले आहे.
स्टार फुटबॉलपटू मेस्सी भारतात येत असल्याच्या बातमीने भारतातील फुटबॉल प्रेमींचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. केरळमध्ये दक्षिण अमेरिकन फुटबॉल संघाची मोठी क्रेझ असून मेस्सी आणि अर्जेंटिना फुटबॉल संघ येथे खूप लोकप्रिय देखील आहेत. आता राज्यातील अनेक जण या बातमीला ‘स्वप्न सत्यात उतरवण्याचा’ क्षण असल्याचे बोलत आहेत. २०२२ मध्ये फिफा विश्वचषक आपल्या नवे केल्यानंतर अर्जेंटिना फुटबॉलकडून सोशल मीडिया पोस्टद्वारे केरळच्या फुटबॉल चाहत्यांचे विशेष आभार मानण्यात आले होते.
केरळ फुटबॉल असोसिएशन अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) च्या सहकार्याने अंतिम तयारीसाठी काम करत आहे, ज्यामध्ये ठिकाणाच्या निवडीबाबतची कामं देखील समाविष्ट आहेत. हा सामना तिरुवनंतपुरममधील ग्रीनफील्ड स्टेडियममध्ये खेळवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा आगामी सामना २०२६ च्या फिफा विश्वचषक पात्रता फेरीपूर्वी अर्जेंटिनाच्या तयारी कार्यक्रमाचा एक भाग असणार आहे. २०२२ मध्ये कतारमध्ये होणाऱ्या विश्वचषकात अर्जेंटिनाचे नेतृत्व करणारा लिओनेल मेस्सी संघाचे नेतृत्व करणार असल्याची चर्चा आहे. जरी सामन्याच्या तारखेच्या जवळ संघाची यादी औपचारिकपणे निश्चित करण्यात येईल.
हेही वाचा : ‘…त्याच्या संघासाठी खूप विचार करतो’, रोहित शर्माच्या नेतृत्वाचे ‘द वॉल’ राहुल द्रविडकडून कौतुक
सुरळीत सुरक्षा, गर्दी व्यवस्थापन आणि आदरातिथ्य याबाबत सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करणारासल्याची अपेक्षा आहे. लिओनेल मेस्सीच्या आगमनामुळे केरळची आंतरराष्ट्रीय प्रतिमा उंचवण्यास मदत होईल आणि जगभरातील चाहते आणि पर्यटक आकर्षित होणार असा विश्वास पर्यटन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. केरळ सरकारकडून मैत्रीपूर्ण सामन्यासाठी अर्जेंटिना संघाला खास आमंत्रित करण्यात आले होते.