Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रेडिशनल रेसलिंग राज्यस्तरीय स्पर्धेत रायगडच्या कराटेपटूंची सुवर्ण कामगिरी!

ट्रेडिशनल रेसलिंग या राज्यस्तरीय स्पर्धेत रायगड मधील अलिबाग आणि पनवेलच्या मुलांनी सुवर्ण कामगिरी केली आहे. या रायगडच्या मुलांना महाराष्ट्रात सर्वात जास्त सुवर्ण पदके मिळाली आहेत. पी एन पी वेश्र्वी कॉलेजची सुरभी अजित पाटील राहणार मल्याण हिने बेल्ट रेसलिंग आणि मास रेसलिंग स्पर्धेत सुवर्णपदक व पेन क्रिएशन सुवर्णपदक अशी एकूण 3 सुवर्णपदक पटकावले.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 25, 2024 | 12:26 PM
ट्रेडिशनल रेसलिंग राज्यस्तरीय स्पर्धेत रायगडच्या कराटेपटूंची सुवर्ण कामगिरी!

ट्रेडिशनल रेसलिंग राज्यस्तरीय स्पर्धेत रायगडच्या कराटेपटूंची सुवर्ण कामगिरी!

Follow Us
Follow Us:

जळगावमध्ये नुकतेच ट्रेडिशनल रेसलिंग या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रायगड मधील अलिबाग आणि पनवेलच्या मुलांनी सुवर्ण कामगिरी केली आहे. या कामगिरीसाठी त्यांचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे. जे एस एम कॉलेजची वेदिका संतोष कवळे राहणार नवगाव हिने बेल्ट रेसलिंग स्पर्धेत सुवर्णपदक आणि मांस रेसलिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. तर पी एन पी वेश्र्वी कॉलेजची सुरभी अजित पाटील राहणार मल्याण हिने बेल्ट रेसलिंग आणि मास रेसलिंग स्पर्धेत सुवर्णपदक व पेन क्रिएशन सुवर्णपदक पटकावले. तीन सुवर्णपदक मिळवणारी सुरभी अजित पाटील ही या ट्रेडिशनल रेसलिंग स्पर्धेची पहिली विद्यार्थिनी ठरली. म्हणून तिचा विशेष मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.

हेदेखील वाचा- मनसे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदी संतोष नलावडे यांची नियुक्ती, राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केलं जाहीर

महाजने गावाची श्रमीका श्रीधर पाटील हिने एक गोल्ड आणि सिल्वर मेडल पटकावले. लायाबा सेहेजाद अन्सारी रामराज हिने दोन सुवर्णपदकांची मानकरी ठरली. श्री विरेन पाटील रेवस यााने सुवर्णपदक पटकावले. तर अंश आल्हाद नाईक कुणे हा देखील सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. अनुष्का परमेश्वर पोले चोंढी पूल सात्रिजे हिने दोन सुवर्णपदक पटकावले. श्रवण संदीप भोईर राहणार दिघोडी याने देखील दोन सुवर्णपदके पटकावली. जिग्नेश गजानन कोळी राहणार अलिबाग कोळीवाडा याने गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडल जिंकले. राहुल ओंमबादुर गुरुम राहणार सोगव याने एक सिल्वर आणि एक गोल्ड मेडल पटकावले.

पनवेल कराटे क्लास मधून स्पंदन योगेश अंकुश राहणार पनवेल तलोजा याने गोल्ड मेडल पटकावले. विघ्नेश संतोष पानसरे राहणार तलोजा पनवेल याने गोल्ड मेडल पटकावले. सोहम रमेश पाटील राहणार तलोजा पनवेल याने गोल्ड मेडल आणि योगेश्वर अमर राहटे राहणार पनवेल तलोजा याने गोल्ड मेडल पटकावले. या सर्व विद्यार्थ्यांनी सुंदर खेळाचे प्रदर्शन केले.

हेदेखील वाचा- मातोश्री आणि उबाठा पक्षाचे रिमोट कंट्रोल दिल्लीत काँग्रेसच्या हाती– आमदार नितेश राणे

या रायगडच्या मुलांना महाराष्ट्रात सर्वात जास्त सुवर्ण पदके मिळाली आहेत. म्हणून ट्रॉफी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सी ए तांबोळी सर आणि सचिन वाघ सर आणि इतर मान्यवर यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देण्यात आली. या मुलांबरोबर राष्ट्रीय पंच रसिका रणजीत मडवी राहणार पनवेल तसेच संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष रामचंद्र कवळे राहणार नवगाव यांना उत्कृष्ट पंच म्हणून ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले .

विजयी स्पर्धकांची 3 ते 6 ऑक्टोबर 2024 रोजी उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हे विद्यार्थी महाराष्ट्रातील नेतृत्व करतील. विशेष म्हणजे या संघटनेचे कार्याध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जयराम बेर्डे यांनी मुलांचं भरभरून कौतुक केले आहे आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देखील दिल्या. तसेच युवा सामाजिक कार्यकर्ते ओमकार अरुण कवळे राहणार नवगाव, रोहन अरुण गुरव राहणार रामनाथ, प्रथमेश पाटील राहणार झिराड, मानसी पाटील राहणार म्हात्रोली, तन्मयी पाटील राहणार पेडंबे तसेच पनवेलचे रणजीत मडवी सर या सर्वांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.

Web Title: Raigad karate players give their best performance at traditional wrestling state level competition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2024 | 12:26 PM

Topics:  

  • Karate players

संबंधित बातम्या

Asian Games : मराठमोळ्या यशस्विनीची चमकदार कामगिरी; महिला टेबल टेनिस संघाला मिळवून दिले क्वार्टर फायनलचे तिकिट
1

Asian Games : मराठमोळ्या यशस्विनीची चमकदार कामगिरी; महिला टेबल टेनिस संघाला मिळवून दिले क्वार्टर फायनलचे तिकिट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.