मातोश्री आणि उबाठा पक्षाचे रिमोट कंट्रोल दिल्लीत काँग्रेसच्या हाती– आमदार नितेश राणे
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असताना सरकारचे रिमोट कंट्रोल मातोश्रीवर होते. आता मातोश्री आणि उबाठा पक्षाचे रिमोट कंट्रोल दिल्लीत काँग्रेसच्या हातात आहे. आता मातोश्री आणि उबाठा पक्षाचे रिमोट कंट्रोल दिल्लीत १० जनपदवर आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे त्यांना आदेश पाळावे लागतात, असा हल्लाबोल भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे.
हेदेखील वाचा- नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांचा तडकाफडकी राजीनामा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात करणार प्रवेश
ते म्हणाले की, मातोश्री आणि उबाठा पक्षाचे रिमोट कंट्रोल दिल्लीत काँग्रेसच्या हातात आहे. पण यापूर्वी बाळासाहेब ठाकरे असताना सरकारचे रिमोट कंट्रोल मातोश्रीवर होते. आता सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे आदेश ठाकरे गटाला पाळावे लागत आहेत आणि त्यांचे आदेश येतील तसे मुंडके हलवतात अशी दयनीय परिस्थिती उबाठा पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची झालेली आहे. दिल्लीतीतून एका नेत्याने महाविकास आघाडीत राहायचे नसेल तर २८८ जागा स्वतंत्रपणे उबाठा पक्ष म्हणून लढवाव्यात असा सल्ला दिलेला आहे. तरी सुद्धा उद्धव ठाकरे या आघाडीच्या दावणीला बांधले गेले आहेत. त्यामुळे भांडुप मध्ये बसून संजय राऊत यांनी कितीही डरकाळ्या फोडल्या तरी दिल्लीत त्यांचा आवाज म्याऊ ..म्याऊ ..असाच येणार.
कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना, आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला ते म्हणाले, नागपूरमधील काँग्रेसच्या बैठकीत मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देण्यावर सर्व नेत्यांनी भर दिला आहे. मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे खेचून आणू असा इशारा दिलेला आहे. हे सर्व पाहता उद्धव ठाकरे आणि उबाठा पक्ष यांची महाविकास आघाडीत दमडीची किंमत राहिलेली नाही. तुमच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री म्हणून तुमचे किती बॅनर लावले, कालांतराने बायको, मुले, मिलिंद नार्वेकर यांचे सुद्धा बॅनर लावले तरी काँग्रेस आणि तुतारी वाले उद्धव ठाकरे यांची लायकी काढण्याचे थांबणार नाही. आणि मुख्यमंत्रीपद तर तुम्हाला कधी देणार नाही असा पुनरुचारही यावेळी आमदार नितेश राणे यांनी केला.
हेदेखील वाचा- सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांच्या प्रयत्नांना यश, डिझेल तस्करीची केंद्र सरकारकडून दखल
मातोश्री आणि उबाठा पक्ष ही पाटणकर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झालेली आहे. त्यामुळे वरून सरदेसाई सर्च जागेवरून आमदारकी लढणार आहे. उद्या पाकिस्तान, बांगलादेश,अमेरिका मधूनही तो लढेल. महायुतीचे हिंदुत्ववादीचेच सरकार येणार आहे. मध्यप्रदेशात भाजपचे राज्य आहे. त्याठिकाणी टीका करता तसे हिंमत असेल तर पश्चिम बंगालमध्ये ममता दीदीचे सरकार आहे. तेथे कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे हल्ला करून लोकांचे प्राण दिवसा घेतले जात आहे, अशी उपरोधिक टीका यावेळी आमदार नितेश राणे यांनी केली.
हिम्मत असेल तर ममता बॅनर्जींचा राजीनामा संजय राऊत यांनी मागावा असे आव्हान सुद्धा यावेळी नितेश राणे यांनी केले. खोके आणि कंटेनर घेऊन आयुष्य घालवणार यांनी महायुती सरकारवर टीका करू नये. 2019 मध्ये उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीत घेऊन येण्यासाठी किती खोके संजय राऊतांनी घेतले आणि किती कंटेनर घेतले त्या पैशातून कुठे जमिनी घेतल्या हे सर्व ज्ञात आहे. ठाकरे आणि राऊत यांचा उदरनिर्वाह खोक्यांवर चालतो अशी टीका यावेळी नितेश राणे यांनी केली.