
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Rashid Khan : पाकिस्तानने पुन्हा अफगाणिस्तानवर हल्ला केला आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, या हवाई हल्ल्यामुळे अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये मोठे नुकसान झाले असून, अंदाजे ४०० लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. रुग्णालयेही उद्ध्वस्त झाल्याचे आणि २५० हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. अफगाणिस्तानचे माजी कॅप्टन रशीद खान यांनी आता पाकिस्तानच्या काबूलमधील हवाई हल्ल्यावर संताप व्यक्त केला आहे.
हवाई हल्ल्याच्या बातमीने रशीद खान यांना दुःख झाले. त्यांनी प्राण गमावलेल्यांबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले, “पाकिस्तानी हवाई हल्ल्यामुळे काबूलमध्ये झालेल्या नागरिकांच्या मृत्यूमुळे मला खूप दुःख झाले आहे. जाणूनबुजून किंवा अपघाताने लोकांच्या घरांवर, शाळांवर आणि रुग्णालयांवर हल्ला करणे हे अत्यंत चुकीचे आहे. विशेषतः रमजानच्या महिन्यात अशा कृती अत्यंत वेदनादायी आहेत.”
रशीद खान पुढे म्हणाले, “यामुळे केवळ द्वेष वाढेल. मी संयुक्त राष्ट्र आणि मानवाधिकार संस्थांना या प्रकरणाची चौकशी करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन करतो. या कठीण काळात मी माझ्या अफगाण लोकांसोबत उभा आहे. आपण या दुःखाच्या काळातून बाहेर पडू आणि एक राष्ट्र म्हणून पुढे वाटचाल करू. आपण नेहमीच असे केले आहे.”
I am deeply saddened by the latest reports of civilian casualties as a result of Pakistani airstrikes in Kabul. Targeting civilian homes, educational facilities or medical infrastructure, either intentional or by mistake, is a war crime. The sheer disregard for human lives,… pic.twitter.com/DbFRRh2qAJ — Rashid Khan (@rashidkhan_19) March 16, 2026
मोहम्मद नबी यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यावर टीका केली. ते म्हणाले, “आज रात्री काबूलमधील एका रुग्णालयात लोकांनी आशा गमावली. उपचारासाठी रुग्णालयात आलेले तरुण पाकिस्तानी लष्कराच्या बॉम्बहल्ल्यात मारले गेले. माता आपल्या मुलांची दारात वाट पाहत होत्या. रमजानच्या २८ व्या रात्री त्यांचे प्राण हिरावले गेले.”
Tonight in Kabul, hope was extinguished at a hospital. Young men seeking treatment were murdered in a bombing by the Pakistani military regime. Mothers waited at the gates, calling their sons’ names. On the 28th night of Ramadan, their lives were cut short. pic.twitter.com/p12617D4de — Mohammad Nabi (@MohammadNabi007) March 16, 2026
पाकिस्तानने हवाई हल्ल्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले असून, त्यांनी नागरिकांना नव्हे तर दहशतवादी तळांना लक्ष्य केल्याचे म्हटले आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर गोळीबार झाल्याच्या वृत्तांदरम्यान काबूलमध्ये हे हवाई हल्ले झाले. फेब्रुवारीपासून दोन्ही देशांमधील तणाव वाढला असून, आता परिस्थिती आणखी चिघळत आहे.