
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
अफगाणिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू रशीद खानने वयाच्या २६ व्या वर्षी लग्न केले होते. त्याने ३ ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये पश्तून रितीरिवाजानुसार लग्न केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अफगाणिस्तान टी-२० कर्णधाराने त्याच्याच कुटुंबात लग्न केले. रशीदसोबत त्याच्या तीन भावांनीही त्याच दिवशी लग्न केले. अफगाणिस्तान क्रिकेट संघातील अनेक खेळाडू उपस्थित होते. काबूलमध्ये झालेल्या लग्न समारंभाचे अनेक फोटो समोर आले आहेत. तथापि, रशीदने लग्न करून जुने वचन मोडले.
आता राशिदने त्याच्या सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे यामध्ये तो पत्नीची बाजू मांडताना दिसला आहे. सोशल मिडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये राशिद खान याने काही पोस्ट शेअर केल्या आहेत यामध्ये जे त्याने फोटो शेअर केले आहेत ते फोटो त्याच्या लग्नाचे आहेत. पण त्याने या फोटोमध्ये त्याच्या पत्नीचा चेहरा दाखवलेला नाही. राशिद खान याने शेअर केलेल्या पोस्ट सध्या फारच व्हायरल होत आहे पण नक्की यामागचं कारण काय आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेने भारतात शेवटची कसोटी मालिका कधी जिंकली होती? आश्चर्यकारक आकडेवारी
शेअर केलेल्या पोस्टमध्ये राशिदने लिहिले आहे की, २ ऑगस्ट २०२५ रोजी, मी माझ्या आयुष्यातील एका नवीन आणि अर्थपूर्ण अध्यायाला सुरुवात केली, माझा निकाह झाला आणि मी अशा स्त्रीशी लग्न केले जी मला नेहमीच अपेक्षित असलेल्या प्रेम, शांती आणि भागीदारीचे प्रतीक आहे. मी अलीकडेच माझ्या पत्नीला एका धर्मादाय कार्यक्रमात घेऊन गेलो होतो आणि इतक्या साध्या गोष्टीवरून गृहीतके बांधली जात आहेत हे दुर्दैवी आहे. सत्य सरळ आहे, ती माझी पत्नी आहे आणि आम्ही लपवण्यासारखे काहीही नसलेले एकत्र उभे आहोत. दयाळूपणा, पाठिंबा आणि समजूतदारपणा दाखवणाऱ्या प्रत्येकाचे आभार.
रशीद खानने अनेक टी-२० लीगमध्ये भाग घेतला आहे आणि त्याला संघात सर्वाधिक अनुभव आहे. त्यामुळे टी-२० विश्वचषकात त्याला संघाचे नेतृत्व देण्यात आले, जे फायदेशीर ठरले. त्याने अफगाणिस्तानसाठी नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. अफगाणिस्तान पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला. दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करल्यानंतर त्यांचा संघ उपांत्य फेरीत बाहेर पडला असला तरी, या टप्प्यावर पोहोचणे हे यशापेक्षा कमी नव्हते.