फोटो सौजन्य - सोशल मिडिया
राशिद खान : अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानला काही दिवसांपूर्वी दुखापत झाली होती असे वृत्त समोर आले होते. आता असे म्हंटले जात आहे की, राशिद खान कसोटी क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. पाठीचा त्रास दूर करण्यासाठी राशिदने हा निर्णय घेतला आहे. यामुळे रशीदला न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्यामध्ये संघात स्थान मिळालेले नाही. अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये 9 ते 13 सप्टेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. दुखापतीमुळे स्टार फिरकीपटू राशिद खानला अफगाणिस्तानच्या 20 सदस्यीय संघात स्थान मिळालेले नाही.
अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या जवळच्या सूत्रांनी 28 ऑगस्ट रोजी आयएएनएसला सांगितले की, रशीदला अफगाणिस्तानच्या 20 खेळाडूंच्या संघातून वगळण्यात आले आहे आणि त्याचे काबूलमधील राष्ट्रीय अकादमीमध्ये पुनर्वसन सुरू आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) न्यूझीलंडविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी जाहीर केलेल्या 20 जणांच्या संघाचा रशीदचा भाग नसणार आहे. संघ व्यवस्थापनाने कसोटीतून विश्रांती घेण्याच्या निर्णयावर एकमताने निर्णय घेतला आहे.
हेदेखील वाचा – भारताची चॅम्पियन आर्मलेस पॅरा तिरंदाज शीतल देवीचे क्वालिफिकेशन राऊंडमधील खास फोटो…
सूत्राच्या माहितीनुसार असे सांगण्यात आले होते की, “रशीदच्या शस्त्रक्रियेनंतर, त्याच्यावर कामाचा ताण वाढवण्याची योजना आहे. तो पुढील सहा महिने किंवा एक वर्ष कसोटी क्रिकेटपासून दूर राहणार आहे. कसोटीत त्याला एका टोकाकडून सतत गोलंदाजी करावी लागते आणि त्याच्या पाठीचा त्रास होतो. पुढील महिन्यात होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी तो तयार नाही.
हेदेखील वाचा – Paris Paralympics 2024 : दुसऱ्या दिनी भारताचे पॅरा खेळाडू मेडलसाठी लढणार! वाचा ३० ऑगस्टचे संपूर्ण वेळापत्रक
रशीद भारतात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकापासून संघाबाहेर होता. त्याला पाठीचा त्रास होता ज्यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्यानंतर अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत त्याने संघाचे नेतृत्व केले आणि संघाला उपांत्य फेरीत नेले होते.