
What do you think! Will India and Pakistan players share a dressing room? These players will be seen together in the BBL
Ravichandran Ashwin to play with Pakistani player in BBL : सप्टेंबर महिन्यात आशिया कप २०२५ ही स्पर्धा खेळवण्यात आली. या स्पर्धेत अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला होता. या सपूर्ण स्पर्धेत भारत आणि पाकिस्तन संघ ३ वेळा आमनेसामने आले होते. तेव्हा भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणे टाळले होते. त्यानंतर यावरून बराच वाद रंगला होता. आता मात्र भारतीय माजी फिरकीपटू थेट पाकिस्तानच्या खेळाडूसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणार असल्याचे वृत्त समोर आले आह. हो, आम्ही भारताचा स्टार माजी फिरकीपटू आर आश्विनबद्दल बोलत आहोत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्त झालेला अनुभवी भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडरकडून खेळताना दिसणार आहे. फ्रँचायझी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एखादा पाकिस्तानी खेळाडू भारतीय खेळाडूसोबत खेळणार आहे. पाकिस्तानी अष्टपैलू शादाब खान बीबीएलमध्ये आर. अश्विनसोबत सिडनी थंडरकडून एकत्र खेळतील. भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडच्या ताणलेल्या संबंधांना पाहता, शादाब आणि अश्विन कसे संवाद साधणार? हे पाहणे मनोरंजक असणार आहे. एक वृत्त आले आहे की, यामुळे तरुण पाकिस्तानी स्टारला भारतीय फिरकी गोलंदाज अश्विनसोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्याची संधी मिळणार आहे.
हेही वाचा : Photo : वरुण-रेड्डी आऊट, कुलदीप-हर्षित IN; पहिल्या T20 मध्ये अशी असू शकते भारताची प्लेइंग 11
शादाब खान व्यतिरिक्त, बीबीएलमध्ये इतर अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटू देखील खेळताना दिसणार आहे. बाबर आझम सिडनी सिक्सर्सकडून, शाहीन आफ्रिदी ब्रिस्बेन हीटकडून, हसन अली अॅडलेड स्ट्रायकर्सकडून, हरिस रौफ मेलबर्न स्टार्सकडून आणि मोहम्मद रिझवान मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळणार आहेत. शादाबसोबत आणि इतर पाकिस्तानी खेळाडूंविरुद्ध अश्विन आता परिस्थिती कशी हातळणार आणि याकडे सर्वांचे लक्ष्य असणार आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर आणि भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरनंतर, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अत्यंत ताणले गेले आहेत. या दोन देशात दरी निर्माण झाली आहे. हा तणाव मैदानावर देखील दिसून आला आहे. युएईमध्ये नुकत्याच झालेल्या आशिया कप दरम्यान, भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दर्शवला होता. शिवाय, अंतिम फेरी जिंकल्यानंतर, भारतीय संघाने पाकिस्तानी वंशाच्या आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून आशिया कपचे विजेतेपद स्वीकारण्यास नाही म्हटले होते.
याबरोबरच पाकिस्तानकडून आशिया कप आणि ज्युनियर विश्वचषकात त्यांचे वरिष्ठ आणि ज्युनियर हॉकी संघ पाठवण्यास देखील नकार देण्यात आला होता. या तणावपूर्ण वातावरणात अश्विन पाकिस्तानी खेळाडूंशी कसा वागतो हे जगभरातील क्रिकेट चाहते पाहणार आहे.