Restaurant Business: Mohammed Siraj will now gain momentum on the business pitch; He has started this restaurant in Hyderabad..
Mohammed Siraj opens restaurant in Hyderabad : भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आता नव्या इनिंगला सुरवात केली आहे. त्याने आता बिझनेस पिचवर आपली नवी सुरुवात केली आहे. खरंतर, मोहम्मद सिराजने त्यांच्या शहर हैदराबादमध्ये एक रेस्टॉरंट सुरू केले आहे. सिराजने हैदराबाद शहराच्या मध्यभागी ‘जोहरफा’ नावाचे रेस्टॉरंट उघडले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सिराजच्या या नवीन रेस्टॉरंटमध्ये पर्शियन, मुघलाई आणि अरबी पदार्थ तसेच चायनीज पदार्थ चाखता येणार आहेत. तथापि, सिराजकडून आपल्या रेस्टॉरंटच्या मेनूमध्ये हैदराबादी चवीची देखील विशेष काळजी घेण्यात आली आहे. ज्यामुळे हैदराबादच्या लोकांना हे रेस्टॉरंट खूप आवडण्याची शक्यता आहे.
हैदराबादमधील रेस्टॉरंटच्या लाँचिंग दरम्यान, सिराजने पत्रकार परिषदेत सांगितले की, “जोहरफा माझ्या हृदयाच्या खूप जवळचे आहे. माझ्या शहराने मला माझी ओळख दिली आहे. हे रेस्टॉरंट हैदराबादच्या लोकांना माझ्याकडून एक भेट आहे. मला असे वाटते की लोकांनी येथे यावे, एकत्र बसावे, चविष्ट जेवण खावे आणि त्यांना हे घरी असल्यासारखे वाटावे.”
मोहम्मद सिराजची क्रिकेट कारकीर्द हैदराबादच्या रस्त्यांवरुन सुरू झाली आणि क्रिकेट स्टेडियमपर्यंत जाऊन पोहोचली. त्याने त्याच्या दमदार गोलंदाजीमुळे टीम इंडियामध्ये एक अढळ स्थान निर्माण केले आहे. त्याने केवळ भारतीय मैदानावरच नव्हे तर परदेशी खेळपट्ट्यांवर देखील अनेकदा संस्मरणीय अशी कामगिरी करून दाखवली आहे. मोहम्मद सिराजने त्याच्या रेस्टॉरंटच्या लाँचची बातमी सोशल मीडियावर शेअर करताच, त्याच्यावरअभिनंदनासह शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. क्रिकेटपटू, चाहत्यांपासून ते खाद्यप्रेमींपर्यंत सर्वांकडून इंस्टाग्रामवर त्याचे अभिनंदन करण्यात आले आहे.
हेही वाचा : ‘ये बंधन तो..’, Yashasvi Jaiswal सोडणार नाही मुंबईची साथ; एमसीएने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, भारतीय क्रिकेट संघातील अनेक क्रिकेटपटूंनी रेस्टॉरंट व्यवसायात आपली इनिंग सुरू केली आहे. क्रिकेट किंग विराट कोहलीने दिल्लीत ‘वन८ कम्यून’ नावाचे रेस्टॉरंट सुरू केले आहे. याशिवाय, क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचे तेंडुलकर आणि सचिन असे दोन रेस्टॉरंट आहेत. या यादीत महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, रवींद्र जडेजा आणि आता मोहम्मद सिराज यांच्या देखील नावांचा समावेश आहे.